कॉंग्रेसचा सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार - व्येंकय्या नायडू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

सोलापूर - कॉंग्रेसने देशात अनेक वर्षे सत्ता भोगली आहे. या सत्तेच्या काळात त्यांनी भ्रष्टाचार केला नाही, असे एकही क्षेत्र शिल्लक ठेवले नाही. जमीन, आकाश, पाताळ या तिन्ही ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. एवढेच नाही, तर अन्नधान्यामध्येही भ्रष्टाचार केला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संसदीय कार्यमंत्री व्येंकय्या नायडू यांनी शुक्रवारी केले. 

महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नायडू आज सोलापुरात आले होते. त्यांच्या दोन सभा झाल्या. मार्कंडेय रुग्णालयाजवळ झालेल्या सभेत नायडू बोलत होते. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदी उपस्थित होते. 

नायडू म्हणाले, ""कॉंग्रेसने जमिनीवर भूखंड, आकाशात स्पेक्‍ट्रम, तर पाताळामध्ये कोळसा भ्रष्टाचार केला आहे. कॉंग्रेसमध्ये अनेकदा फूट पडली आहे. वेगवेगळ्या नावाने हा पक्ष ओळखला जातो. याउलट भाजपची स्थिती आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, अमित शहा, नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व असलेला हा अखंड पक्ष आहे. ज्याप्रमाणे देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे, त्याचप्रमाणे महापालिकेतही भाजपची सत्ता असणे गरजेचे आहे. 

नोटाबंदीबाबत नायडू म्हणाले, ""नोटाबंदीच्या माध्यमातून काळा पैसा बाहेर आला आहे. ज्यांनी लोकांची लूट करून हा पैसा मिळविला आहे, त्यांची यादी आमच्याकडे तयार आहे.'' डाव्या पक्षांचे फारसे अस्तित्व राहिले नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना मतदान केल्याचा काहीच उपयोग होणार नाही, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

शिंदेंनी हेही केले नाही 
नायडू म्हणाले, ""जेवण करून लोकांना थोडीशी डुलकी घ्यायच्या वेळेस सभा ठेवली आहे. उशीर झाला तर हैदराबादला जाऊ शकत नाही. कारण, विमान उशिरा जात नाही. टेक्‍स्टाईलचे शहर म्हणून साऱ्या जगाला परिचित असणाऱ्या सोलापूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विमानतळावर साधी "नाईट लॅंडिंग'ची सोय केली नाही. त्याचा फार मोठा फटका सोलापूरला बसला आहे.'' त्यांनी आपल्या भाषणाची सुरवातच विमानतळाच्या मुद्द्यावरून केली.

Web Title: Corruption in all sectors of the Congress