मिरजेत धूम स्टाइलने 30 लाख लुटले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मिरज - शहरातील सतारमेकर गल्लीतून आज भरदिवसा चोरट्यांनी "एटीएम'मध्ये भरणा करण्यासाठी आणलेली तब्बल 30 लाखांची रोख रक्कम उभ्या केलेल्या जीपमधून लंपास केली. गाडीची काच फोडून ही रक्कम चोरट्यांनी लांबवली. दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी ही रक्कम लांबवल्याचे येथील पोलिसांनी प्राथमिक तपासात शोधले आहे. याबाबत दिगंबर धुमाळ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

तक्रारीतील तपशिलाप्रमाणे धुमाळ आठ वर्षांपासून एसआयएस प्रोसिगर होल्डिंग कंपनीत एटीएम कस्टोडियन म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत एक चालक, एक लोडर असे कर्मचारी असतात. कंपनीने तिघांना एक जीप दिली आहे. धुमाळ दररोज मिरजेच्या स्टेट बॅंकेच्या मार्केट यार्ड शाखेतून एटीएमसाठी लागणारी रोकड ताब्यात घेतात. ही रक्कम सरासरी 25 ते 30 लाख असते. एटीएमच्या मागणीप्रमाणे रक्कम त्यात भरली जाते. 

धुमाळ आज सकाळी साडेदहा वाजता कंपनीच्या पुष्पराज चौकातील कंपनीच्या ऑफिसमध्ये येऊन तेथून एटीएमकडील मागणीची माहिती घेऊन पावणेअकरा वाजता मिरजेतील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मार्केट यार्ड शाखेत आले. शाखा व्यवस्थापक देशमुख यांच्याकडे 60 लाखांची रोख रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी ताब्यात घेतली. यात दोन हजारच्या नोटांचे 20 लाखांचे बंडल आणि पाचशेच्या नोटांचे 40 लाखांचे आठ बंडल होते. त्यापैकी 20 लाखांची रोकड कर्मवीर चौकातील दोन एटीएममध्ये प्रत्येकी दहा लाखप्रमाणे भरली. तेथून ते शिवाजी पुतळा, गणेश तलावमार्गे सतारमेकर गल्लीतील एटीएमजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास आले. त्या वेळी रोकड ठेवलेल्या पिशवीतून दोन हजारांच्या नोटांचे दहा लाख रुपये घेतले. ते भरण्यास धुमाळ स्वतः, प्रशांत काटकर आणि चालक बाबासाहेब कांबळे असे तिघे चालत एटीएमकडे आले. पैसे भरून एटीएममधून बाहेर पडताना अज्ञाताने या तिघांना सांगितले की, गाडीची काच फोडून त्यातून कापडी पिशवी चोरून नेली आहे. चोरटे सतारमेकर गल्लीतील एमएसईबी कार्यालयाच्या दिशेने पळून गेलेत. त्या वेळी तिघांनीही गाडीत पिशवी आहे का, याची खात्री करून एमएसईबीकडे धावत जाऊन चोरट्यांचा पाठलाग केला; पण तोपर्यंत चोरटे पळाले होते.

टॅग्स