दुसऱ्या खेट्यासाठी अलोट गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबा मंदिरातील दुसरा खेटा आज पारंपरिक पद्धतीने उत्साहात झाला. या वेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील सुमारे एक लाख भाविकांनी जोतिबाचे दर्शन घेतले. दरम्यान, पहाटे तीन वाजल्यापासून कोल्हापुरातील भाविक पायी येण्यास सुरवात झाली. काही भाविकांनी पंचगंगा नदी ते कुशिरे, गायमुख तलाव, जोतिबा डोंगर हे अंतर पायी अडीच ते तीन तासांत पूर्ण केले. आजही डोंगर, रस्ते चांगभलंच्या गजराने दुमदुमून गेले. सायंकाळपर्यंत भाविकांची मोठी गर्दी होती. 

आज सकाळी मंदिरात अभिषेकावेळी केदारी उपाध्ये, शरद बुरांडे, बंडा उमराणी, सूरज उपाध्ये, प्रकाश उपाध्ये यांनी श्री केदारकवच स्त्रोत्र, केदार महिमा या विधीचे पठन केले. सकाळी नऊ वाजता श्रींची सालंकृत महापूजा बांधली. दुपारी धुपारती सोहळा झाला. रात्री साडेआठ वाजता भव्य पालखी सोहळा झाला. या वेळी लाखो भाविकांनी पालखीवर गुलाल-खोबरे व पुष्पवृष्टी केली. सोहळ्यास देवस्थानचे अधीक्षक लक्ष्मण डबाणे, सिंदिया ट्रस्टचे अधीक्षक आर. टी. कदम, देवसेवक, पुजारी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. 

कोडोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र कडक बंदोबस्त होता. 

- नैवेद्य करण्यासाठी भाविकांची झुंबड 
- ठाकरेमिटके गल्लीपर्यंत दर्शन रांग 
- श्रींची सालंकृत पूजा 
- डोंगरकपारीला पहाटेच जाग 

महाराष्ट्र

मुंबई : यंदाही राज्यात बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे यंदा राज्यात...

01.36 PM

मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून...

10.48 AM

मुंबई : देश बलशाली बनवण्यासाठी सर्वांनी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदूषणापासून मुक्ती, देशाला...

08.30 AM