कोल्हापुरातील ऊसदराची बैठक म्हणजे नाटकच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

कऱ्हाड - ऊसदरासाठी कोल्हापूरला झालेली बैठक म्हणजे नाटक होते. तो निर्णय फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठीच झाला आहे. साखर कारखाने मागणीप्रमाणे दर देत नाहीत, तोपर्यंत उसाला तोड घेऊ नका. तुम्ही साथ द्या, तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा जादा दर देऊन दाखवतो, असे आवाहन बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज येथे शेतकऱ्यांना केले आहे. दर जाहीर न करताच कारखाने सुरू केल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करतील व त्यामुळे होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

बळिराजा संघटनेच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की ऊसदराचा निर्णय राज्य शासनाला घ्यायचा होता, तर सर्व शेतकरी संघटनांच्या मध्यवर्ती बैठकीत चर्चेतून घ्यायला हवा होता. कोल्हापूरची बैठक एकतर्फी झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जादा दर मिळवून देण्यासाठी बळिराजा शेतकरी संघटनेने रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी केली आहे. सध्या साखरेला सर्वाधिक दर आहे. गुऱ्हाळमालक प्रतिटन उसाला दोन हजार 800 रुपये दर देत आहे; मग कारखाने जादा दर का देऊ शकत नाहीत? सरकार कारखानदारांना पाठीशी घालत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बळिराजा संघटना शेतकऱ्यांबरोबर आहे.

महाराष्ट्र

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीवरून राज्य सरकारवर पुन्हा शरसंधान केले आहे. राज्यात कर्जमुक्तीची...

05.33 AM

मुंबई - कोकण परिसरात भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पक्षात घेतले जाणार हे निश्‍चित आहे...

04.45 AM

मुंबई - स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत राज्यभरात 418 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सरकार हादरले आहे. मात्र त्यातील जवळपास 60 टक्के...

03.45 AM