Savings will be one lakh crores due to indigenous ethanol
Savings will be one lakh crores due to indigenous ethanol

स्वदेशी इथेनॉलमुळे एक लाख कोटींची होणार बचत

सोलापूर : यंदा पेट्रोलियम मंत्रालयास महाराष्ट्रातून 44 कोटी लिटर इथेनॉलचा कोटा अपेक्षित आहे. त्यामुळे सुमारे 12 हजार कोटींची बचत होणार आहे. भविष्यात इंधनात किमान 30 टक्‍के इथेनॉल मिसळल्यास सरकारची तब्बल एक लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यातून इंधनाचे दर आटोक्‍यात येण्यास मदत होईल, असा विश्‍वास कारखानदारांनी व्यक्‍त केला आहे.

परदेशातून इथेनॉल आयातीला सरकारने बंदी घालत स्वदेशातील कारखानदारांकडीलच इथेनॉल खरेदीला प्रोत्साहन दिले आहे. तसेच इंधनाचे दर कमी होण्यासाठी इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्प उभारणीवरील कर्जाचे निम्मे व्याज सरकार भरणार आहे. उसानंतर साखर आणि इथेनॉलसाठी हमीभाव देणारे भारत हे एकमेव राष्ट्र असल्याचा दावा कारखानदारांनी केला आहे. सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने इथेनॉल निर्मिती केली जाते.

- इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल तर उत्तर प्रदेश दुसरे.
- महाराष्ट्रातील 92 कारखान्यांद्वारे होतेय इथेनॉल निर्मिती
- केंद्र सरकारद्वारे दरवर्षी 7.5 लाख लिटर क्रूड ऑइल आयात

- सध्या इंधनात 10 टक्‍के इथेनॉल त्यात 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ अपेक्षित 

- बी-हेव्ही इथेनॉलसाठी प्रतिलिटर 52.50 रुपये तर सी-हेव्हीसाठी 43.25 रुपये दर 

- उसाच्या रसापासून थेट इथेनॉल मिळणार प्रतिलिटर 59.50 रुपये 

- नगर (16) नंतर सोलापूर जिल्ह्यात (14) सर्वाधिक इथेनॉल निर्मिती कारखाने 

बी-हेव्ही (साखर आणि इथेनॉलही तयार होते.), सी-हेव्ही (कमी साखर उत्पादन आणि इथेनॉलही) आणि थेट उसाच्या रसापासून (साखर उत्पादन नाही फक्‍त इथेनॉल) असे इथेनॉलचे तीन प्रकार आहेत. यापैकी बी-हेव्ही हा उत्तम पर्याय असून त्यातून शेतकऱ्यांना चांगला दर कारखानदारांना परवडेल. 

- उमेश परिचारक, इथेनॉल प्रकल्पधारक 

महाराष्ट्राची सद्यस्थिती 
इथेनॉल निर्मिती कारखाने 
92 
दररोज सरासरी क्षमता 
30,000 लिटर 
दरवर्षीचे अपेक्षित उत्पादन 
58.5 कोटी लिटर 
सरकारने दिलेला कोटा 
44.58 कोटी लिटर 
प्रत्यक्ष पुरवठा 
21.88 कोटी लिटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com