राजगुरुनगर:मुलावरील अत्याचार प्रकरणी फाशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

पुणे - राजगुरुनगर येथे आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याचा गळा दाबून खून करणाऱ्या खलकसिंग जनकसिंग पांचाळ या 35 वर्षीय तरुणास राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविली आहे.

राजगुरुनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी पांचाळला मरेपर्यंत फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कडाचीवाडी (चाकण, ता. खेड, जि. पुणे) येथे 15 मे 2013 रोजी ही घटना घडली होती. रोहित उर्फ सोनू गोरख डुकरे असे मयत मुलाचे नाव आहे. आरोपीने यापुर्वीही 29 सप्टेंबर 11 रोजी नऱ्हे (पुणे) येथे एका बांधकामावर काम करीत असलेल्या कटुंबातील आठ वर्षाच्या मुलीचा खून केला होता. बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत या न्यायालयाने दिलेली ही पहिलीच गंभीर शिक्षा आहे.

महाराष्ट्र

कोल्हापूर : राज्यभरातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार...

11.57 AM

जून 2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाला उपविजेतेपदावर...

04.39 AM

नाशिक - राज्यातील ‘अ’ दर्जाची तीर्थस्थळे सोडली, तर ‘ब’ आणि ‘क’ दर्जाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी पुरेसा निधी नसल्याचे...

04.33 AM