महावितरण ऍप्ससाठी नाशिकमध्ये चार लाख वीज ग्राहकांची नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

नाशिक - महावितरण कंपनीकडे एक कोटी चार लाख ग्राहकांनी महावितरण मोबाईल ऍप्सच्या वापरासाठी मोबाईल क्रमांकांची नोंदणी केली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील चार लाख 12 हजार ग्राहकांचा समावेश आहे. वीजविषयक प्रणाली स्मार्टफोनवर आल्याने रीडिंग, वीजबिल, ऑनलाइन बिल, नवीन वीज कनेक्‍शन, मीटरवाचन ते देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मोबाईल वापर सुरू झाला. वीजग्राहकांच्या तत्पर व ऑनलाइन सेवेसाठी महावितरण कंपनीने सुरू केलेल्या मोबाईल ऍप्सला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सात महिन्यांत जवळपास दहा लाख ग्राहकांनी हे ऍप डाउनलोड केले आहे. ऍपद्वारे आतापर्यंत एक कोटी 70 लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेतले आहे.

नाशिक - महावितरण कंपनीकडे एक कोटी चार लाख ग्राहकांनी महावितरण मोबाईल ऍप्सच्या वापरासाठी मोबाईल क्रमांकांची नोंदणी केली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील चार लाख 12 हजार ग्राहकांचा समावेश आहे. वीजविषयक प्रणाली स्मार्टफोनवर आल्याने रीडिंग, वीजबिल, ऑनलाइन बिल, नवीन वीज कनेक्‍शन, मीटरवाचन ते देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मोबाईल वापर सुरू झाला. वीजग्राहकांच्या तत्पर व ऑनलाइन सेवेसाठी महावितरण कंपनीने सुरू केलेल्या मोबाईल ऍप्सला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सात महिन्यांत जवळपास दहा लाख ग्राहकांनी हे ऍप डाउनलोड केले आहे. ऍपद्वारे आतापर्यंत एक कोटी 70 लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेतले आहे. सात लाख 43 हजार ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या ऍप वापरले, तर 45 हजार 813 ग्राहकांनी ऍप्सच्या माध्यमातून नवीन वीजजोडणी घेतली.