वृक्षारोपणाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जून 2016

जळगाव - चिमुरड्यांच्या आयुष्यातील शाळेचा पहिला दिवस म्हणजे थोडे कुतूहल... थोडी भीती... थोडी धडधड... नवीन स्कूल बॅग, नवीन पुस्तके, वह्या... नवा युनिफॉर्म... आणि सोबतीला आई! आई व बाबा असले तरी चिमुरड्यांची रडारड, आरडाओरडा, रुसवे, फुगव्यांचा खेळ हा ठरलेला... याच खेळात आणखी रंग भरण्यासाठी "सकाळ‘ माध्यम समूहातर्फे शाळेच्या पहिल्याच दिवशी अर्थात उद्या (ता.15) विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

‘सकाळ‘ने शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील विविध शाळांमध्ये सकाळी साडेसातला आणि दुपारी बाराला शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. "सकाळ‘चे युनिट मॅनेजर संजय पागे, सहाय्यक वृत्तसंपादक अतुल तांदळीकर, जाहिरात व्यवस्थापक संदीप त्रिपाठी, वितरण व्यवस्थापक प्रमोद पाटील हे शाळांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते रोप लागवड करणार आहेत. उपक्रमासाठी आमदार सुरेश भोळे यांनी सहकार्य केले आहे. शहरातील विविध शाळांमध्ये प्रत्येकी पाच रोपे लावणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना ही रोपे संवर्धनासाठी दत्तक दिली जाणार आहेत.

या शाळांमध्ये होणार वृक्षारोपण
सिद्धी विनायक माध्यमिक विद्यालय, बीयूएन रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूल, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय, ला. ना. सार्वजनिक विद्यालय, आर.आर. विद्यालय, प्रगती विद्यामंदिर, पी.एन. लुंकड कन्या शाळा, ए.टी. झांबरे विद्यालय, भगीरथ इंग्लिश स्कूल, वाय.डी. पाटील विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल (प्रतापनगर)

Web Title: student welcome tree plantation in jalgav