नैसर्गिक संकटग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा हात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

नागपूर - सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी तसेच अपघात मृत्यू आणि नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मोठा आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या चार महिन्यांत वैद्यकीय मदत, अपघाती मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तसेच नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या नागरिकांना ४८ कोटी रुपयांची मदत केली. 

नागपूर - सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी तसेच अपघात मृत्यू आणि नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मोठा आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या चार महिन्यांत वैद्यकीय मदत, अपघाती मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तसेच नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या नागरिकांना ४८ कोटी रुपयांची मदत केली. 

मुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांना मदतीचा मुख्यमंत्र्यांना स्वेच्छाधिकार आहे. त्यांनी अधिकाराचा उपयोग करीत नागरिकांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी पाऊल उचलल्याचे आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांकडे राज्यभरातून मदतीसाठी अर्जांचा पाऊस पडला. राज्यात गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्र्यांना १२ हजार ५४९ अर्ज मिळाले. गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी गरजवंतांना ७९ कोटी ७७ लाख रुपये वितरित करण्यात आले. नैसर्गिक संकटातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी तसेच एखाद्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दीड वर्षात १६ कोटी ५४ लाख १८ हजार रुपये वितरित करण्यात आले. दीड वर्षात गरजवंतांना ९६ कोटी ३१ लाख रुपये राज्यात मदतीसाठी देण्यात आले. 

 

मुख्यमंत्री सहायता निधीत ३०२ कोटी 
सहायता निधीत दोन वर्षांत ३०२ कोटी रुपयांचा निधी जमा झाला. त्या तुलनेत मदतीसाठी वापरण्यात आलेला निधी फारच कमी असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. २०१४-१५ या वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीत १५६ कोटी ६४ लाख ६३ हजार १२३ रुपये तर एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ पर्यंत १४६ कोटी २९ लाख ९६ हजार रुपये जमा झाले. त्या तुलनेत सव्वादोन वर्षांत १०५ कोटींचीच मदत नागरिकांपर्यंत पोहोचली.

महाराष्ट्र

कऱ्हाड - मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करून देणार नाही, असा इशारा देऊन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व सुकाणू समिती...

05.03 AM

भारतामध्ये वाहतुकीसाठी आजवर फारसा वापरण्यात न आलेला देशांतर्गत जलवाहतूक हा एक चांगला पर्याय आहे. जागतिक बॅंकेच्या 4200 कोटी...

03.48 AM

मुंबई - भाजप सरकार देशात विकास आणि स्वातंत्र्य देण्याचे काम करीत आहे. या सरकारने समाजमाध्यमांना दिलेले स्वातंत्र्य हे लोकशाही...

03.03 AM