डेंगीनंतर आता "स्क्रब टायफस'चा धोका

File photo
File photo

यवतमाळ : जिल्ह्यात डेंगी, मलेरिया, टायफाईड व "व्हायरल' या आजारांसह "स्क्रब टायफस' या नव्या तापाच्या आजाराचा धोका वाढला आहे. येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ व क्रिटीकेअरचे संचालक डॉ. दीपक अग्रवाल यांनी या नवीन आजाराचे चार रुग्ण शोधून काढले. त्यामुळे भारताच्या सीमावर्ती डोंगराळ भागात व नेपाळमध्ये आढळणारा हा तापाचा प्रकार जिल्ह्यातही पाय रोवत असल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यातील विविध रुग्णालयात "डेंगी' व "व्हायरल'च्या तापाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान तर, येथील हिराचंद मुणोत क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण तापाच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी आले. डॉ. अग्रवाल यांना त्यांच्या आजाराबाबत शंका आली. त्यांनी बुधवारी (ता. 15) पाच रुग्णांचे रक्तनमुने घेतले होते. त्यापैकी दोन रुग्ण "स्क्रब टायफस'चे निघाले. त्यांच्या रक्तात या आजाराचे विषाणू असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.हिराचंद मुणोत क्रिटीकेअर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार "स्क्रब टायफस' हा एक प्रकारचा तीव्र स्वरूपाचा ताप येणारा संसर्गजन्य आजार आहे. भारत-नेपाळच्या डोंगराळ भागातील खासकरून घनदाट गवताळ जंगलातून हा आजार पसरतो. हा आजार सर्वांत प्रथम 1930 मध्ये जपानमध्ये आढळला. या रोगामुळे 2016 मध्ये हिमाचल प्रदेशात 20 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या आजारावर वेळीच योग्य निदान व उपचार करणे गरजेचे असते, असे डॉ. देशमुख यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

हा आजार काय आहे?
- ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात हा आजार दिसून येतो
- पावसाळ्यात गवतात होणाऱ्या पिसू, गवतावरील माशा व किड्यांच्या चावल्यामुळे हा आजार होतो.
- आजाराची लक्षणे ः डोकं दुखणे, थंडी वाजणे, ताप येणे. शरीराच्या ज्या भागावर किडा चावतो त्या जागेवर काळ्या रंगाची जखम होते. त्याभोवती एक ते दोन सेमी. व्यासाची गडद लाल रंगाचे रिंग (स्क्रब) तयार होते. ती जखम दुखत नाही. त्यातून कोणत्याही प्रकारचा स्राव वाहत नाही. त्यामुळेच या आजाराला 'स्क्रब टायफस' असे म्हटले जात असावे.
- आजाराचा परिणाम - रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण घटत जाते. त्याचा परिणाम शरीरातील किडनी, लिव्हर, हृदय व मेंदूवर होण्याची शक्‍यता अधिक असते. काही वेळा रुग्ण कोमात जाऊन त्याच्या जिवाला धोका संभवतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com