सोळा नक्षलवाद्यांचा खातमा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

गडचिरोलीत चकमक; सी-60 कमांडो पथकाची कारवाई; 7 जण जखमी
गडचिरोली - एटापल्ली व भामरागड तालुक्‍यांच्या सीमेवरील बोरिया जंगल परिसरात आज सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या पोलिस- नक्षल चकमकीत पेरमिली दलम कमांडर तथा नक्षलवादी चळवळीचा विभागीय सदस्य साईनाथ (वय ३५) व विभागीय सदस्य सिनू (वय ३८) हे दोघे व तीन महिला नक्षली यांच्यासह सोळा नक्षलवाद्यांचा गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० कमांडोने खातमा केला. या चकमकीत सात नक्षली जखमी झाले. 

गेल्या आठवड्यात घोट येथे नक्षलवाद्यांनी वनविभागाच्या लाकूड डेपोला आग लावली होती. या घटनेनंतर नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम तीव्र केली होती. पेरमिली दलम कमांडर साईनाथ याच्या नेतृत्वात दोन ते तीन दलम एकत्र येऊन मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आज अकराच्या सुमारास सकाळी ‘सी-६०’ पथकाला नक्षलवाद्यांचा ठावठिकाणा लागला. याच दरम्यान छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या बोरिया जंगलात नक्षलविरोधी पथक व सीआरपीएफ जवानांवर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.

प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू करून नक्षलवाद्यांना चारही बाजूने घेरले. यात १६ नक्षलवादी जागीच ठार झाले, तर ७ जण जखमी झाले. साईनाथ याच्यावर १७ लाखांचे, तर सिनूवर २५ लाखांचे बक्षीस होते.

सर्वांत मोठी कारवाई
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ३५ वर्षांतील नक्षलवादी चळवळीविरोधातील रविवारची कारवाई सर्वांत मोठी मानली जाते. या अगोदर २०१३ मध्ये अहेरी तालुक्‍यातील गोविंदगाव जंगल परिसरात सहा नक्षलवादी ठार झाले होते. त्यानंतर ६ डिसेंबर २०१७ रोजी  सिरोंचा तालुक्‍यातील कल्लेड जंगल परिसरात सात माओवाद्यांचा खातमा करण्यात आला होता. 

Web Title: naxalite Police commando skirmish crime