आठ दिवसांत सव्वा कोटींचा दंड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

आटपाडी - गेल्या आठ दिवसांत आटपाडी महसूल विभागाने वाळू तस्करीच्या विरोधात जोरदार कारवाईची मोहीम राबवली आहे. आठ दिवसांत तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत 48 ब्रास वाळू जप्त करून तब्बल 1 कोटी 30 लाख रुपये दंड केला आहे. महसूलच्या या कारवाईमुळे वाळू तस्करात खळबळ उडाली आहे. 

आटपाडी तालुका दुष्काळी असता तरी येथे मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू असते. महसूल प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आल्यामुळे एक प्रकारे तस्करीला प्रोत्साहनच मिळते. एप्रिल 2016 पासून ते डिसेंबरअखेर पर्यंत जेमतेम 52 ठिकाणी कारवाई करून 31 लाख दंड केला होता. मात्र काही दिवसांपासून वाळू तस्करी विरोधात मोठ्या तक्रारी झाल्याने आणि प्रसिद्धी माध्यमानी आवाज उठवून प्रशासनाच्या संशयास्पद कामावर टीका केली. त्यामुळे प्रशासनाने कारवाईची मोहीम राबवली. आठ दिवसांत तीन तर नवीन वर्षात 12 ठिकाणी कारवाई केली. यात डबईकुरणात पिंजारे वस्तीवर तीस ब्रासचा साठा केलेल्या डेपोवर स्वतः तहसीलदार अजित पाटील यांनी छापा टाकून 81 लाख दंडाची कारवाई केली. तेथे धनंजय सातारकर, उदय देशमुख, पिंटू पाटील, पिंटू देशमुख आणि नितीन बालटे यांनी एकत्रित वाळू डेपो केला होता. निंबवडे येथेही असाच साठा केला होता. तेथे 12 ब्रास साठा जप्त करून 32 लाख दंड केला. तसेच चार दिवसांपूर्वी शहाजी पाटील (बस्तवडे) यांच्या ट्रकवर कारवाई करून सहा ब्रासचा साठा जप्त केला. करगणीचे नाथा सरगर यांच्या ट्रॅक्‍टरवरही कारवाई केली. नवीन वर्षापासून प्रशासनाने कारवाईची जोरदार मोहीम सुरू केली आहे.