राज्यातील 154 गावे 'तंटामुक्त' घोषित

राज्यातील 154 गावे 'तंटामुक्त' घोषित

मुंबई - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली.

गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन राज्याची समृद्धीकडे वाटचाल व्हावी, या उद्देशाने 15 ऑगस्ट 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राज्यात सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत राज्यात आतापर्यंत 18 हजार 993 गावांना तंटामुक्त पुरस्कार देण्यात आला आहे. तर, 1 हजार 298 गावांना विशेष शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. नवव्या वर्षातील मोहिमेच्या अंमलबजावणी कार्यक्रमानुसार 15 ते 30 ऑगस्ट 2016 या कालावधीत राज्यातील 154 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन या मोहिमेत सहभाग घेतला होता.

विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरलेली गावे - नाशिक जिल्हा - चिंचोली (ता. सिन्नर), नगर जिल्हा - गोगलगाव (ता. नेवासा), पेमगिरी (ता. संगमनेर), पुणे जिल्हा - नरसिंहपूर (ता. इंदापूर), उस्मानाबाद जिल्हा - तुरोरी व तलमोड (ता. उमरगा), महालिंगरायवाडी (ता. मुरुम), परभणी जिल्हा - आनंदवाडी (ता. पालम), वझूर (ता. गंगाखेड), यवतमाळ जिल्हा - वालतूर तांवडे व डोंगरगाव (ता. उमरखेड).
तंटामुक्त गावे ः पालघर जिल्हा - नांदगाव (ता. जव्हार), रत्नागिरी जिल्हा - कांगवई (ता. दापोली), सिंधुदुर्ग जिल्हा - कोचरा (ता. वेंगुर्ला), नाशिक जिल्हा - शिवडी, गाजरवाडी, शिवरे, चापडगाव (ता. निफाड), आघार खुर्द, कौळाने नी, वजीरखेडे, विराणे (ता. मालेगाव), साळसाणे, आसरखेडे, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, पाथरशम्बे (ता. चांदवड), वडगाव बल्लेगाव (ता. येवला), नगर जिल्हा - चिंचोली (ता. राहुरी), शिरसगाव (ता. श्रीरामपूर), जळगाव जिल्हा - भोणे, गारखेडा, कवठळ (ता. धरणगाव), मस्कावद खु., वाघाडी (ता. रावेर), पोहरे, भवाळी, आडगाव, मेहुणबारे (ता. चाळीसगाव), बिडगा/ कुंड्यापाणी, गलवाडे, विरवाडे (ता. चोपडा), आडगाव (ता. एरंडोल), धुळे जिल्हा- छाईल, बुरडखे/ पाचमोडी/ पिंजारवाडी/ सांबरसोंडा, टेंभे (वार्सा), दापुरा, गरताड, कंढरे आगारपाडा, छावडी आमोद, खुडाणे, ऐचाळे (ता. साक्री), मैलाणे कामपूर (ता. शिंदखेडा), कापडणे, बुरझड (ता. धुळे), कोल्हापूर जिल्हा - मळगे बु. मादयाळ (ता. कागल), नेसरी (ता. गडहिंग्लज), सोलापूर जिल्हा - खंडाळी (ता. माळशिरस), राळेरास (ता. बार्शी), औरंगाबाद जिल्हा- मंगरुळ, सांजखेडा, टाकळीमाळी/ एकलहरा/ महमदपूर/ मलकापूर/ हुसेनपूर (ता. औरंगाबाद), किनगाव, वारेगाव (ता. फुलंब्री), घोडेगाव, भालगाव, वरझडी, फुलशिवरा (ता. गंगापूर), उस्मानाबाद जिल्हा- येडशी, चिलवडी, जहागीरदारवाडी, बामणीवाडी (ता. उस्मानाबाद), बोरगाव, फुलवाडी (ता. तुळजापूर), परभणी जिल्हा- धारासूर (ता. सोनपेठ), टाकळगव्हाण (ता. परभणी), हिंगोली जिल्हा - बोरखेडी (पी) (ता. सेनगाव), इंचा, लोहगाव, लिंबाळा सरहद, बोराळा (ता. हिंगोली), जवळा बु. (ता. बसमत), अमरावती जिल्हा- शिवर (ता. दर्यापूर), आसेगाव (ता. चांदूर बाजार), दाढीपेढी (ता. भातकुली), अकोला जिल्हा- समशेरपूर, बोरगाव नि., जितापूर (ता. मूर्तिजापूर), जांभवसू (ता. बार्शीटाकळी), गोरेगाव खु. (ता. अकोला), रिधोरा, मालवाडा, खंडाळा (ता. बाळापूर), भंडारज बु. (ता. पातूर), वाशीम जिल्हा - सावंगा जहां., कार्ली, किनखेडा (ता. वाशीम), रिठद, एखलासपूर (ता. रिसोड), हनवतखेडा, सोनाळा वाकापूर (ता. मालेगाव), जोगलदरी जुनापानी (द), इचोरी, कळंबाबोडखे, चिखलागड, फाळेगाव (ता. मंगरुळपीर), धानोरा घाडगे (बु), वरोळी, सावळी (ता. मानोरा), यवतमाळ जिल्हा- नांदेपेरा (ता. वणी), बुरांडा (खडकी) (ता. मारेगाव), बारड (ता. बाभूळगाव), मेंढला (ता. कळंब), चापडोह (ता. यवतमाळ), खरबी, वालतूर तांवडे, डोंगरगाव, टाकळी (ता. उमरखेड), सराटी, वरणा, जागजई, वाऱ्हा, सरई, निदा (ता. राळेगाव), पाटण बोरी, वागदा, पाथरी, आकोली खुर्द, बोरगाव (कडू), ताडउमरी, सुन्ना (ता. केळापूर), पेकर्डा, सायखेडा, रामगाव (हरु) (ता. दारव्हा), मानकापूर, नांझा, सातफळे (ता. कळंब), खडकी, चहांद, किन्ही जवादे, पिपळापूर (ता. राळेगाव), ब्राह्मणवाडा प., कोहळा (ता. नेर), नागपूर जिल्हा- लोहगड (ता. कळमेश्वर), रामपुरी (ता. सावनेर), कट्‌टा (ता. रामटेक), वराडा (वाघोली) (ता. पारसिवनी), सरांडी (ता. भिवापूर), चंद्रपूर जिल्हा- उदापूर, चिखलगाव, सोनेगाव, बेटाळा, कन्हाळगाव (ता. ब्रह्मपुरी), सिंगडझरी (ता. सिंदेवाही).

11 गावांना विशेष शांतता पुरस्कार
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक 34 गावे तंटामुक्त
नाशिक व वाशीम जिल्ह्यातील प्रत्येकी 15 गावे तंटामुक्त
धुळे व जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी 13 गावे तंटामुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com