एसटीच्या तिकिटात 18 टक्के दरवाढ - दिवाकर रावते

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात 15 जूनपासून 18 टक्के वाढ केली जाणार आहे. हा निर्णय नाइलाजास्तव घेण्यात येत आहे, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. 

मुंबई - एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात 15 जूनपासून 18 टक्के वाढ केली जाणार आहे. हा निर्णय नाइलाजास्तव घेण्यात येत आहे, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. 

रावते म्हणाले, की वाढता डिझेल खर्च आणि कामगारांच्या वेतनवाढीमुळे तिकीटदरात 30 टक्के वाढ करावी, असे महामंडळाने प्रस्तावित केले होते; मात्र प्रवाशांवर अधिक आर्थिक भार पडू नये, यासाठी ही दरवाढ 30 टक्‍क्‍यांऐवजी केवळ 18 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी सुमारे 460 कोटींचा बोजा वाढला आहे. तसेच कामगारांसाठी नुकतीच 4,849 कोटींची वेतनवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

राज्य सरकारने डिझेलवरील विविध कर माफ करावेत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीला त्यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकीट दरवाढीबाबत फेरविचार केला जाईल, असेही रावते यांनी स्पष्ट केले. 

- यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णय 
म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाचे तिकीट 7 रुपये असेल तर त्याऐवजी 5 रुपये आकारणार 
- 8 रुपये तिकीट असल्यास 10 रुपये तिकीटदर आकारणार. 
- यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्‍न सुटणार असून प्रवासी व वाहकातील वादावादी थांबेल. 

साधी गाडी 
शिवशाही 
मार्ग = सध्याचे भाडे - नवे भाडे 
मुंबई- कोल्हापूर = 417 - 490 
शिवशाही = 620 - 730 
मुंबई-रत्नागिरी = 392 - 465 
शिवशाही = 574 - 675 
मुंबई - औरंगाबाद = 486 - 525 
शिवशाही = 700 - 825 
मुंबई - अहमदनगर = 182 - 215 
शिवशाही = 280 - 320 
मुंबई - पुणे = 164 - 195 
शिवशाही = 253 - 300 
 

Web Title: 18 percent increase in ST's ticket says diwakar raote