आठ महिन्यात तब्बल 22 हजार अपघात

22 thusand accidents in eight months
22 thusand accidents in eight months

सोलापूर, ता. 18 : जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात राज्यातील विविध महामार्गांवर तब्बल 21 हजार 968 अपघात झाले आहेत. त्यामध्ये आठ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमध्ये 19,164 जण गंभीर जखमी झाले असून सहा हजार 862 जण किरकोळ जखमी झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे आहे.

राज्यात दिवसेंदिवस अपघातप्रवण ठिकाणांची संख्या वाढत आहे. महामार्गांवर पडलेले खड्डे, वाहनचालकांमधील बेशिस्त, वाहनांचा वाढलेला वेग, वाहतूक नियमांची पायमल्ली आणि संबंधित शासकीय विभागांकडून होणारे दुर्लक्ष ही कारणे अपघातासाठी जबाबदार असल्याचे दिसून येते. महामार्गांवर हेल्मेट सक्‍ती असूनही बहुतांशी दुचाकीस्वारांकडे ते दिसून येत नाही. तसेच वाहतूक नियम अपघात रोखण्यासाठीच असतात, याची जाणीव आता वाहनचालकांमध्ये नसल्याचेही स्पष्ट होते. अपघात रोखण्यासाठी वाहलचालकांनी स्वत:हून शिस्त लावून घेणे हाच उत्तम उपाय आहे. 

महामार्गांवरील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहनचालकांना शिस्त लागावी, कायद्याचे पालन करावे यासाठी आरटीओ विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. परंतु, अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे. कारवाईने अपघात थांबणार नाहीत तर त्यासाठी वाहनचालकांमध्ये स्वंय जागृतीची गरज आहे. मागील आठ महिन्यात सोलापूरात तब्बल साडेतीनशे वाहनचालकांचे परवाने निलंबित केले आहेत. - संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

यंदाच्या अपघातांची स्थिती 
जानेवारी ते ऑगस्ट 
एकूण अपघात - 21968 
गंभीर जखमी - 19164 
किरकोळ जखमी- 6862 
मृत्यू - 8039

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com