विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात 24 जण बुडाले 

विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात 24 जण बुडाले 

मुंबई  - गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच काही दुर्घटनांमुळे उत्साहावर विरजण पडले. मिरवणुकीदरम्यान रविवारी राज्यभरात किमान 24 जणांचा बुडून मृत्यू झाला. मराठवाड्यात चौघांचा बुडून मृत्यू झाला, तर सातारा व भंडारा येथे प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड, बुलडाणा, नांदेड आणि नगरमध्ये प्रत्येकी एकाला प्राण गमवावे लागले. दरम्यान, मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ समुद्रात नौका उलटल्याने दुर्घटना घडली. मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी नौकेतील पाचही जणांना वाचविले. 

नाशिकमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू 
नाशिक - विल्होळी परिसरातील वालदेवी धरणावर गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. चेतन दिनकर बोराडे (वय 22) असे तरुणाचे नाव आहे. 

विदर्भात पाच जणांचा बुडून मृत्यू 
नागपूर - विदर्भात चार मुलांसह एका व्यक्‍तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटना सोमवारी आणि रविवारी गणेश विसर्जनदरम्यान घडल्या. भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांत एकूण चार मुलांचा, तर अमरावती येथे एका व्यक्‍तीचा मृत्यू झाला. 

जळगावात चौघांचा बुडून मृत्यू 
जळगाव - जिल्ह्यात गणेश विसर्जनाप्रसंगी वेगवेगळ्या घटनांत चौघांचा बुडून मृत्यू झाला. जळगाव शहरातील अविनाश ईश्‍वर कोळी (वय 20) हा विसर्जनासाठी मेहरुण तलावावर गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत भुसावळ तालुक्‍यातील ऑर्डनन्स फॅक्‍टरी येथील नितीन उखर्डू मराठे (वय 32) याचा तापी नदीपात्रात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. जामनेर तालुक्‍यातील मनीष वामन दलाल या तरुणाचा बुडून बळी गेला, तर भडगाव तालुक्‍यात प्रफुल्ल रमेश पाटील या मुलाचा बुडून अंत झाल्याची घटना घडली. 

मराठवाड्यात चौघांचा मृत्यू 
जालना/नांदेड - जालना शहरातील मोती तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाला. अमोल संतोष रणमोडे (वय 17), निहाल खुशाल चौधरी (वय 26), शेखर मधुकर भदनेकर (वय 20, तिघेही जालना शहर) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, संबंधितांच्या संतप्त नातेवाइकांनी आज नगरपालिकेसमोर मृतदेहांसह केले ठिय्या आंदोलन केले. भरपाईचे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले. विसर्जनावेळी बिलोली (जि. नांदेड) येथे मांजरा नदीपात्रात उतरलेल्या गणेशभक्ताचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गंगाधर पिराजी बरबडे (वय 22) असे त्याचे नाव आहे. 

अकोला, बुलडाण्यात तिघे बुडाले 
अकोला/बुलडाणा - अकोला जिल्ह्यातील एक, तर बुलडाणा जिल्ह्यातील दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाला. बुलडाण्यातील घटनेमध्ये अन्य तिघे बुडाले होते. त्यांना वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. 

घटनाक्रम 
- मुंबईत नाचताना दोघे मृत्युमुखी, तलावात बुडून एकाचा मृत्यू 
- चारकोप येथे मूर्ती अंगावर पडून चार जण जखमी 
- सोलापुरात विसर्जनावेळी पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू 
- नगर जिल्ह्यात राहता व संगमनेरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू 
- सातारा व भंडारा येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com