पंढरीत चार लाख भाविक दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

पंढरपूर - ‘अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटीन माहेरा आपुलिया’ अशी आस उराशी बाळगून आषाढी यात्रेच्या आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे चार लाखांहून अधिक वारकरी येथे दाखल झाले आहेत. बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला असल्याने वारकऱ्यांनी यात्रेसाठी यंदा मोठी गर्दी केली आहे. दर्शन रांगेत आजही मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत होती, त्यामुळे काही जणांना दर्शनासाठी तब्बल १९ तास लागत होते.

केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातूनदेखील वारकरी येथे आले आहेत. आज रात्रीपर्यंत सुमारे चार लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले होते. यंदाही पंढरीच्या राजस सुकुमाराला डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत लाखो वारकरी दर्शनाच्या रांगेत उभे आहेत.

Web Title: 4 lakh pilgrims in pandharpur