एक्‍झीम बँकेची 80 कोटींची फसवणूक 

एक्‍झीम बँकेची 80 कोटींची फसवणूक 

मुंबई : पीएनबी बॅंकेचे कर्ज प्रकरण गाजत असताना आता केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) आर्थिक गुन्हे शाखेने एक्‍सपोर्ट इम्पोर्ट बॅंक ऑफ इंडिया (एक्‍झीम) बॅंकेची 80 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ग्रॅंट रोड परिसरातील एका कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बॅंकेने कंपनीला दिलेल्या कर्जाचा वापर व्यवसायाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करत आहे. 

नाना चौक येथील एका कंपनीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कंपनी ऍल्युमिनियम कंटेनर व पत्र्याची निर्मिती करते. याप्रकरणी बॅंकेने केलेल्या तक्रारीनुसार 2004 ते 2015 या कालावधीत कंपनीने व इतर अनोळखी व्यक्तींनी फॉरेन करन्सी प्री कम पोस्ट शिपमेंट क्रेटिड (पीसीपीएस) आणि वर्किंग कॅपिटल टर्म कर्जाच्या (डब्ल्यूसीटीएल) माध्यमातून बॅंकेचे नुकसान केले. त्याअंतर्गत आरोपींनी गुन्हेगारी कट रचून 2004 मध्ये कंपनीला 20 लाख अमेरिकन डॉलरचे (14 कोटी रुपये) फॉरेन करन्सी प्री कम पोस्ट शिपमेंट क्रेडिट मंजूर करून घेतले. तसेच त्यानंतर ती रक्कम देण्यातही आली. या क्रेडिटचे वेळोवेळी नूतनीकरण करण्यात आले. याशिवाय 50 कोटी रुपयांचे वर्किंग कॅपिटल टर्म कर्जही जुलै 2010 मध्ये कंपनीला मंजूर करण्यात आले. त्याचेही वेळोवेळी नूतनीकरण करण्यात आले. डिसेंबर 2012 मध्ये ही रक्कम 45 कोटी रुपये करण्यात आली. हे फंड कंपनीने हस्तांतरित करून बॅंकेचे 80 कोटी 39 लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

व्यावसायिक वापरासाठी ही रक्कम कंपनीला देण्यात आली होती, पण प्रत्यक्षात या रकमेचा त्याच्यासाठी वापर झाला नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या रकमेचा व्यवसायाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. तसेच काही ठिकाणी गुंतवणूकही करण्यात आली आहे. कंपनीने एका त्रयस्थ कंपनीकडून केलेल्या ऑडिटनंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानुसार याप्रकरणी तक्रार करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com