राज्यातील 9 लाख बेघरांना मिळेना निवारा ; उद्दिष्ट 11 लाखांचे अन्‌ पूर्ण दोन लाखच घरे 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 जून 2018

मागील वर्षी विलंबाने उद्दिष्ट मिळाल्याने घरकुलांची कामे अपूर्ण राहिली आहेत. 2016 ते 1028 या कालावधीतील घरे डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
अनिल नवाळे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण यंत्रणा 

सोलापूर : गोरगरिबांच्या स्वप्नातील घरे पूर्ण व्हावीत आणि त्यांना त्यांच्या हक्‍काचे पक्‍के घर मिळावे, म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी व शबरी आवास योजना राबविल्या जातात; परंतु या योजनांतर्गत मागील दोन वर्षांत 11 लाखांच्या उद्दिष्टापैकी फक्‍त दोन लाख बेघर लोकांनाच घरे मिळाली आहेत. 

देशातील बेघर असलेल्यांना 2022 पर्यंत घरे देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना वगळता अन्य योजनेतील लाभार्थ्यांना वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. शबरी व पारधी आणि रमाई आवास योजनेंतर्गत बहुतांशी जिल्हे पिछाडीवर आहेत.

वाळूचे संकट असल्याने कामे अपूर्ण राहत आहेत. त्यातच शासनाने एका वर्षात घरे पूर्ण करा; अन्यथा अनुदान मिळणार नाही, असा फतावा काढला. त्यामुळे लाभार्थ्यांची पंचाईत झाली आहे. मागील वर्षी राज्यातील ठाणे, नाशिक, सिंधुदुर्ग, सातारा, पालघर, वर्धा, रत्नागिरी, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, बीड वगळता अन्य जिल्ह्यांत 10 टक्‍केसुद्धा कामे झालेली नाहीत. 

आकडे बोलतात... 
2016-17 
नोंदणीकृत लाभार्थी 
4,05,191 
पूर्ण झालेली घरे 
1,81,584 
प्रतीक्षाधीन लाभार्थी 
2,23,607 
 
(2017-18) 
नोंदणीकृत लाभार्थी 
6,94,676 
पूर्ण झालेली घरे 
15,340 
प्रतीक्षेतील लाभार्थी 
6,79,336 

Web Title: 9 lakh homeless refugees in the state The target is 11 lakhs and two lakhs of home