सत्ताधारी-विरोधकांकडून आमीर खानचे अभिनंदन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 एप्रिल 2017

मुंबई - "दंगल' पाकिस्तानात प्रदर्शित करताना चित्रपटातून भारताचा तिरंगा काढू नये, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या अभिनेता आमीर खानच्या भूमिकेबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आमीर खानचे शुक्रवारी (ता.7) अभिनंदन केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिक्कामोर्तब केले आहे.

भारतात गेल्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला "दंगल' चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होण्याच्या शक्‍यता आता मावळल्या आहेत. कारण पाकिस्तानमध्ये "दंगल' प्रदर्शित करण्याआधी तेथील चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) चित्रपटातील भारतीय तिरंगा आणि राष्ट्रगीताशी संबंधित दोन दृष्य कमी करण्यास सांगितले होते. मात्र, आमीर खानने ठोस भूमिका घेत, दोन्ही दृष्य कापण्यास विरोध केला होता. त्याच्या या भूमिकेचे देशभरात स्वागत करण्यात येत आहे. यामुळे देशात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत काल आमीर खानच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमीरचे अभिनंदन केले.