डॉ. खिद्रापुरेविरोधात लवकरच कठोर कारवाई - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - सांगलीतील म्हैसाळ येथील गर्भपात प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या विरोधात सरकार कठोर कारवाई करील, असे आश्‍वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. या प्रकरणी आपण म्हैसाळला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

विधान परिषदेत या प्रकरणावरून गदारोळ झाला. त्यावर सखोल चौकशी केली जात असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुंडे यांनी दिले. सांगलीतील अवैध गर्भपातप्रकरणी आता 24 तास उलटले आहेत. अजूनही डॉक्‍टर बाबासाहेब खिद्रापुरे याला अटक झालेली नाही. पोलिसांची पाच पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. मिरज पोलिसांची तीन पथके आणि क्राईम ब्रॅंचची पथके डॉ. खिद्रापुरे याचा शोध घेत आहेत, अशी माहिती मुंडे यांनी दिली. 

Web Title: abortion case sangli