उमेदवारी अर्ज रविवारीही स्वीकारणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज रविवारीही स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली.

मुंबई - महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज रविवारीही स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, आयोगाने 11 जानेवारी 2017 रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महापालिका निवडणुकांतील उमेदवारांचे अर्ज 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2017 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2017 या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. रविवारी (ता.29) अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे आधी जाहीर करण्यात आले होते; परंतु आता या रविवारीही ते स्वीकारण्यात येतील.

दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी 1 ते 6 फेब्रुवारी 2017 या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. या कालावधीतील रविवारीही (5 फेब्रुवारी) अर्ज स्वीकारले जातील, अशी माहितीही सहारिया यांनी दिली.

महाराष्ट्र

केंद्रात आणि राज्याच भाजपचे सरकार आले तेव्हा त्यांच्याद्वारे सोशल मिडीयाचा केला गेलेला वापर हे त्यांच्या अभूतपूर्व यशामागचे...

02.03 PM

मुंबई: मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मनी आणि जैन मुनींच्या जीवावर विजय मिळविल्याचा थेट आरोप शिवसेनेचे खासदार संजय...

12.36 PM

मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या घोषणेवरून...

05.12 AM