'गोरक्षकांप्रमाणे दलितांनाही हाती काठी घेता येते'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 ऑगस्ट 2016

मुंबई - गुजरातमध्ये मेलेल्या गाईची कातडी काढणाऱ्या दलित (रुखी) समाजातील चार युवकांवरील अमानुष अत्याचारामागे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगाडिया यांचाच हात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दलित समाजाला खरोखर न्याय द्यायची इच्छा असेल, तर त्यांनी तोगडिया यांना अटक करावी, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते व माजी खासदार ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केली. 

शुक्रवारी आझाद मैदानात मुंबईतील रुखी समुदायाच्या हजारो लोकांनी गुजरात सरकार, मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात तीव्र निदर्शने केली. गुजरातमध्ये सुरू असलेले दलितांवरील अत्याचार हा योगायोग नसून, षड्‌यंत्राचा भाग आहे. हा कट राजकोट येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्य मुख्यालयात शिजला होता, असा दावा आंबेडकर यांनी या वेळी केला. गोरक्षकांना जशी हाती लाठी घेता येते, तशी दलितांना पण घेता येते, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. 

निदर्शनामध्ये भाकप, माकप, भारिप, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील शेकडो सफाई कामगार सहभागी झाले होते. अहमदाबाद ते उना दलित समाजाची रॅली काढण्यात येणार असून, त्यात मुंबइतील रुखी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय या वेळी घेतला. बासकाठी, पाटणवाडा, सौराष्ट्र, दोतोर, कंडीप्रांत, पंच्यांशी इत्यादी रुखी समाजाच्या संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांचा आझाद मैदानात झालेल्या निदर्शकांमध्ये मुख्यत्वे भरणा होता. 

व्यासपीठावर माकपचे नेते अशोक ढवळे, तिस्ता सेटलवाड, उल्का महाजन, अरुण मेहता, उत्तम खोब्रागडे, शेख झाकिर हुसेन, उर्दू लेखक रेहमान अब्बास आदी उपस्थित होते.

Web Title: According to "stick up goraksakam can be dalit