योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार 

योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार 

मुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पुढे योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. 

परिवहन आयुक्त कायालयाच्या परिपत्रकानुसार योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेले, योग्यता प्रमाणपत्र आहे; परंतु वाहन रस्त्यावर चालण्यास धोकादायक आहे अशा प्रकारच्या वाहनांच्या तपासणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून, या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परिवहन आयुक्त कार्यालयातील परिवहन उपायुक्त व परिवहन सहआयुक्त यांना महसुली विभागनिहाय विभागांचे वाटप करून त्यांच्यावर कामकाजाची जबाबदारी आयुक्तांनी सोपविण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. या मोहिमेत वाहनास वैधयोग्यता प्रमाणपत्र आहे; परंतु वाहन सदोष असल्याचे आढळल्यास तपासणी अधिकाऱ्याने संबंधित वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र निलंबित करावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com