तरुणांच्या संकल्पनांचा कामकाजात अवलंब - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई - राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या तरुणांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात चर्चा केली.

मुंबई - राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या तरुणांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात चर्चा केली.

प्रशासनाला तरुणांकडून नवनव्या संकल्पना मिळाव्यात, प्रशासन आणि तरुणांमध्ये सुसंवाद वाढावा आणि तरुणांचा सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्राशी संपर्क वाढावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली "सीएम फेलोशिप' योजना यशस्वी होताना दिसत आहे. या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या तरुणांच्या विविध संकल्पनांचा प्रशासकीय कामकाजात निश्‍चितच अवलंब केला जाईल, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राज्यभरातील कल्पक अशा 44 तरुणांची या फेलोशिपसाठी निवड करण्यात आली असून, मागील सात महिन्यांपासून ते कार्यरत आहेत. या कालावधीतील आपले अनुभव या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
फडणवीस म्हणाले, की विविध क्षेत्रांचा विकास करताना तो शाश्वत होईल यावर भर देण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये शाश्वत काम करण्याबरोबरच लोकांची मानसिकता बदलण्यावर भर देण्यात येत आहे. जलयुक्त शिवारमधून जी गुंतवणूक करण्यात येत आहे, त्यामधून शेतीचा शाश्वत विकास होऊ शकेल.

या कार्यक्रमामुळे प्रशासकीय कामकाज जवळून पाहण्याची व त्यामध्ये योगदान देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व "फेलों'नी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

संग्रामपूर तालुक्‍यात "मागेल त्याला शेततळे' योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तेथील लोकांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Adopt concepts of youth work