शिवशाहीर डॉ. तनपुरे यांचा विनामुल्य व्याख्यानाचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

राहुरी (अहमदनगर): पोवाडे आणि शिवायणाच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास उलगडणारे शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या स्वप्नातला शिवाश्रम कसा असेल? त्या मागची संकल्पना काय आहे? या सर्व बाबीला उजाळा देण्यासाठी तनपुरे महाराज यांनी राज्यभर विनामुल्य व्याख्यान देण्याचा निर्धार केला आहे.

एका पायाने अधु असलेल्या शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी अपंग, अनाथ, वृंध्दांसाठी शिवाश्रमची कल्पना साकारली. देश-विदेशात पार पडलेल्या आपल्या कार्यक्रमातून मिळणार्‍या मानधनातुन त्यांनी काही रक्कम बाजूला ठेवून ती या भव्य-दिव्य साकारणाऱ्या शिवाश्रमासाठी खर्च केली जाणार आहे. गेल्या वर्षी या शिवाश्रमासाठी शिर्डी येथे त्यांना गोविंद घुगे यांनी जमिन दान केली आहे. 3 डिसेंबर 2016 रोजी त्याचे भूमिपुजन संपन्न झाले.

दरम्यान, शिवाश्रमाची जनजागृती करण्यासाठी आपण आता शिवचरीत्रातुन 'मी बि घडलो तुम्ही बि घडा' हा अविस्मरणीय प्रेरणादायी कार्यक्रम एक वर्ष विनामुल्य व्याख्यान सेवा देणार आहे. या विषयावर व्याख्यान आयोजित करायचे असल्यास 9860708270, 9822812775 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तनपुरे यांनी केले आहे.