अजिंठा, वेरूळ लेण्यांच्या संवर्धनासाठी जपानची मदत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

मुंबई - जगभरातील व देशाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांना औरंगाबाद येथील अजिंठा-वेरूळ लेण्यांचे मोठे आकर्षण आहे. त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील संवर्धनासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जेआयसीए) आता महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाला (एमटीडीसी) मदत करणार आहे. 

बाह्य मूल्यांकनाविषयी नुकतेच जेआयसीएच्या भारतातील कार्यालयाने "एमटीडीसी'ला पत्र पाठवले होते. 27 नोव्हेंबरपासून 24 डिसेंबरपर्यंत "जेआयसीए'चे प्रतिनिधी या स्थळांना भेट देतील. त्यानंतर जवळपास वर्षभर म्हणजेच ऑक्‍टोबर 2017 पर्यंत याविषयी अभ्यास केला जाईल. निश्‍चित करण्यात आलेल्या समितीवर केंद्र सरकारच्या "एएसआय', "एएआय' या संस्थांबरोबर "एमटीडीसी' आणि इतर राज्यांतील सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींचीही निवड करण्यात आली आहे. अजिंठा आणि वेरूळ येथे पर्यटकांच्या सोईबरोबर वास्तूंचे संवर्धन करणेही अत्यंत आवश्‍यक आहे. याचा पहिला टप्पा 1993 ते 2004 दरम्यान पूर्ण झाला. दुसरा टप्पा 2016 आणि 17 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

महाराष्ट्र

सांगली - नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाकडून (एनएचबी) मिळणाऱ्या हरितगृह अनुदानासाठी गुजरात, मध्य प्रदेश ही राज्ये आणि विदर्भाचा अपवाद...

04.18 AM

मुंबई - श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला....

04.03 AM

मुंबई - सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष...

03.36 AM