अजितदादा म्हणतात, 'राजकारण यालाच म्हणतात...' 

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची सभा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात नुकतीच चांगलीच रंगली. या सभेत आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या "लय भारी' ते अजित पवार यांच्या "राजकारण यालाच म्हणतात...' या वक्तव्याची अनोखी मेजवानी इंदापूरकरास अनुभवण्यास मिळाली. त्यातून सभेत वेळोवेळी हास्याचे स्फोट झाले. 

इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची सभा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात नुकतीच चांगलीच रंगली. या सभेत आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या "लय भारी' ते अजित पवार यांच्या "राजकारण यालाच म्हणतात...' या वक्तव्याची अनोखी मेजवानी इंदापूरकरास अनुभवण्यास मिळाली. त्यातून सभेत वेळोवेळी हास्याचे स्फोट झाले. 

या सभेत जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे व प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या "आडवा व जिरवा' कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. "आमदार भरणे यांनी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही,' असे अप्पासाहेब जगदाळे यांनी, तर "सर्वांनी आदर्श घ्यावा अशी शाळा चालविली,' असे प्रशस्तिपत्रक गारटकर यांनी दिले. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

"नैसर्गिक दुष्काळी परिस्थिती असताना तालुका विकासाच्या बाबतीत मागे गेला,' अशी बोचरी टीका हर्षवर्धन पाटील करतात. त्याचा समाचार घेताना भरणे म्हणाले, ""मला आता कुठे चान्स मिळाला आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील यांचे 22 गावांवरील प्रेम नसून, सोंग आहे. गेली 20 वर्षे सत्ता असताना त्यांना 22 गावांना पाणी देता आले नाही. बावडा ते नरसिंहपूर रस्ता करता आला नाही. त्यामुळे त्यांना जनतेने घरी बसवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांनी नीरा नरसिंहपूरचा 260 कोटी 86 लाख रुपयांचा विकास आराखडा केला. तसेच, उजनीकाठच्या विजेचा पुरवठा 2 तासांवरून 5 तास करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बापट यांनी मदत केली. त्यामुळे ते लय भारी, तसेच तुम्ही मला आमदार करून ही संधी दिल्याने तुम्हीसुद्धा लय भारी.'' त्यांच्या या वाक्‍यांवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

या सर्वांच्या भाषणाचा धागा पकडत अजित पवार म्हणाले, ""हर्षवर्धन पाटील यांनी संस्था काढल्या. मात्र, संस्थेवर कर्तबगार माणसांऐवजी नातेवाईक मंडळी बसवल्याने संस्था डबघाईस आल्या. त्यांना झोप कशी लागते?'' 

दरम्यान, राज्यभरात विधान परिषद व इतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने पवार यांना भाषण सुरू असताना फोन येत होते. त्यात एका फोनवरून त्यांना, "माघार घेतली बरं का?' असा निरोप येतो. त्यावर ते समाधान व्यक्त करत, ""तुझ्याबरोबर असलेल्यास ही माहिती देऊ नकोस,'' असे बजावले. मात्र, त्या वेळी ध्वनिक्षेपक सुरू असल्याने समोर बसलेल्या हजारो लोकांना ते ऐकू गेले. त्यामुळे सभेत हशा पिकतो. त्यावर,""मीसुद्धा चान्स घेतला. राजकारण यालाच म्हणतात,'' असा राजकारणाचा उघड धडाच त्यांनी सर्वांना दिला. सर्वांच्या या चौकार, षटकारास दादांच्या गुगलीने चितपट केल्याची चर्चा नंतर सर्वत्र रंगली.

महाराष्ट्र

पुणे : "बाई तू आम्हास्नी दारूबंदी कशी करायची ह्ये मोबाईलवर दाखवलं. आम्हास्नी त्ये समद समजलं, आता आम्हास्नी आमच्या गावात दारूबंदी...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीवरून राज्य सरकारवर पुन्हा शरसंधान केले आहे. राज्यात कर्जमुक्तीची...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - कोकण परिसरात भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पक्षात घेतले जाणार हे निश्‍चित आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017