सर्व बॅंका राहणार 1 एप्रिलपर्यंत खुल्या

पीटीआय
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई - रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना 1 एप्रिलपर्यंत सलग कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणि खासगी क्षेत्रातील बॅंका या कालावधीत खुल्या राहणार आहेत.

मुंबई - रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना 1 एप्रिलपर्यंत सलग कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणि खासगी क्षेत्रातील बॅंका या कालावधीत खुल्या राहणार आहेत.

या काळात रिझर्व्ह बॅंकेची काही कार्यालयेही सुरू राहणार आहेत. सरकारी सेवा आणि सुविधांची देयके, करभरणा यासाठी सर्व बॅंकांना सुटी न घेता 1 एप्रिलपर्यंत कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, आर्थिक वर्ष संपत असल्याने आणि नवे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत असल्याने सर्व बॅंकांनी कामकाज 1 एप्रिलपर्यंत सुटी न घेता सुरू ठेवावे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसह खासगी बॅंकांचे कामकाज सलग 1 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.