कर्जमाफीवरून सर्वपक्षीय सदस्य आक्रमक 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी कर्जमाफीने वादळी ठरला. चार दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा सर्वपक्षीय आमदारांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमदार आक्रमक पद्धतीने अडून बसल्याने या गोंधळात पुरवण्या मागण्या मंजूर केल्या, तर विधेयके मंजूर करण्यात आली. 

गोंधळामुळे सुरवातीला तीनदा स्थगिती दिल्यानंतर शेवटी संपूर्ण दिवसासाठी कामकाज तहकूब करावे लागले. सभागृहाची बैठक सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्‍नोत्तराची घोषणा केली. यानंतर विरोधक आणि शिवसेना, तसेच भाजपच्या सदस्यांनीही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत (वेल) येण्यास सुरवात केली. त्यापूर्वीच अध्यक्षांनी कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केले. यानंतर 11 वाजून 5 मिनिटांनी कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटात पुन्हा अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले. 

मुख्यमंत्री दुपारी 12 वाजता आल्यानंतर शोक प्रस्ताव मांडला गेला. महाडचे माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर लगेच सदस्यांनी पुन्हा गोंधळ सुरू केला. या गोंधळात पुरवणी मागण्या, तसेच काही विधेयके मंजूर करण्यात आली. गोंधळ वाढत चालल्याने सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर कामकाज सुरू झाल्यावर काही विधेयके विचारात घेतली. यातच शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी एक निवेदन मांडले. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा जोर वाढत चालल्याने आणि सदस्य अधिक आक्रमक झाल्याने शेवटी 12 वाजून 38 मिनिटांनी सभागृह संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

सभागृहाबाहेर घोषणाबाजी 
कामकाज सुरू होण्याच्या आधी सभागृहाबाहेर पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अर्धा तास जोरदार घोषणाबाजी केली. "शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे', "या सरकारचं करायचं काय, खाली मुंडक वर पाय', "शेतकरी कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', अशा प्रकारची घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. निषेधाचे फलक घेऊन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. शिवसेनेच्या सदस्यांनी मात्र सभागृहाबाहेर निदर्शने टाळत सभागृहातच आवाज वाढवलेला दिसला. 

Web Title: All party members from aggressive debt waiver