उत्तराखंडमध्ये महाराष्ट्राचे सर्व पर्यटक सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

या यात्रेकरुंमध्ये 179 यात्रेकरु असून औरंगाबाद (102), पुणे (38), सांगली (33), जळगाव (6) या यात्रेकरुंचा समावेश असून सर्व यात्रेकरु सुखरुप आहेत. उत्तराखंडच्या चार्मोली जिल्हाधिकारी यांच्याशी या संबंधी बोलणे झाले आहे. 

मुंबई - उत्तराखंड राज्यातील विष्णू प्रयागला झालेल्या भूस्खलनामुळे चारधाम यात्रेला गेलेल्या राज्यातील 179 यात्रेकरु अडकले आहेत. तेथे कोणतीही जिवीत व वित्तहानी झालेली नाही. राज्य शासन स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून सर्व यात्रेकरु  सुरक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली.

या यात्रेकरुंमध्ये 179 यात्रेकरु असून औरंगाबाद (102), पुणे (38), सांगली (33), जळगाव (6) या यात्रेकरुंचा समावेश असून सर्व यात्रेकरु सुखरुप आहेत. उत्तराखंडच्या चार्मोली जिल्हाधिकारी यांच्याशी या संबंधी बोलणे झाले आहे. 

हा रस्ता दुपारी 3 वाजता चालू होणार आहे. त्यानंतर अडकलेल्या यात्रेकरुंना रेल्वे स्टेशनला आणून त्या ठिकाणाहून रेल्वेने त्यांना राज्यात परत आणले जाणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Web Title: All tourists of Maharashtra are safe in Uttarakhand