आधार संलग्नित बॅंकेत शिष्यवृत्तीची रक्कम जमा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई - उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील तंत्रनिकेतन महाविद्यालयांसाठी राबवल्या जाणाऱ्या दोन शिष्यवृत्ती योजनांच्या लाभाची रक्कम आता थेट विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.

मुंबई - उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील तंत्रनिकेतन महाविद्यालयांसाठी राबवल्या जाणाऱ्या दोन शिष्यवृत्ती योजनांच्या लाभाची रक्कम आता थेट विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना अनुदानित आणि खासगी विनाअनुदानित महाविद्यालये-तंत्रनिकेतनमध्ये राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काच्या 50 टक्के मर्यादेपर्यंतच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काच्या 50 टक्के मर्यादेपर्यंतच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्तीची रक्कम आता थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. या योजनेनुसार उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, तसेच मत्स्य विभागातील विशिष्ट व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम राज्य सरकार देते. आता या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2017-18 पासून ही रक्कम संबंधित शैक्षणिक संस्थांऐवजी शिष्यवृत्ती स्वरूपात विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.

Web Title: The amount of scholarship support affiliated bank deposit