ST Strike | अनिल परब यांची उद्या एसटी महामंडळासोबत तातडीची बैठक

Anil Parab
Anil ParabSakal

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी उद्या दुपारी साडे तीन वाजता महत्वाची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित राहणार असून अनिल परब यांच्या दालनात ही बैठक होणार आहे.

गेले पाच महिने एसटी कामगारांचा संप सुरु आहे. विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. परवा दिवशी काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. दरम्यान शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेता येणार नाही , अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यानंतर या बैठकीत काय चर्चा केली जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष राहाणार आहे.

Anil Parab
"...कुठल्याही सणाच्या दिवसांमध्ये मांसाहारावर बंदी नको"- जितेंद्र आव्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com