"विक्रमी' पुरवणी मागण्यांवर विरोधी पक्षनेत्यांचे टीकास्त्र 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - राज्य सरकारने 2016-17 आर्थिक वर्षात आठ हजार 833 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून आर्थिक बेशिस्तीचा नवा विक्रम केल्याचे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे. 

मुंबई - राज्य सरकारने 2016-17 आर्थिक वर्षात आठ हजार 833 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून आर्थिक बेशिस्तीचा नवा विक्रम केल्याचे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे. 

पुरवणी मागण्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, पुरवणी मागण्यांवर राज्य चालवता येत नाही, या बाबतचा धोक्‍याचा इशारा राज्य सरकारला यापूर्वीच दिला होता; परंतु तरीही इतक्‍या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या येणे, याचाच अर्थ या बेशिस्तीमुळे राज्य आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघाल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर करण्यासारखेच आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. 

राज्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मोठे संकट असताना कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत; पण आकस्मिक निधीतून जाहिरातींसाठी आठ कोटी रुपये खर्च केले जातात, हे दुर्दैव असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. मंजूर निधीतील 53 टक्के खर्च अजूनही अखर्चित राहिला आहे आणि चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे 17 दिवस बाकी आहेत. आता उरलेल्या दिवसांमध्ये कोणत्या पारदर्शकतेने सरकार हा निधी वापरणार आहे, असा सवालही विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी उपस्थित केला. 

Web Title: Anti-record schedule demands leaders criticized