वाढता वाढता वाढे "ऍप्स'चा पसारा!

App
App

मुंबई - काही सेकंदात डाऊनलोड होऊन माहितीचा खजिना खुला करणाऱ्या ऍप्सनी कंपन्यांना आणि स्मार्टफोनधारकांना मोहिनी घातली आहे. मोबाईल तंत्रज्ञानाने जगाला कवेत घेतले आहे. माहितीचे नवे स्रोत म्हणून ऍप्सनी बाजारपेठेचा ताबा घेतला आहेत. सरकारी यंत्रणांपासून गल्लीबोळातील सेवा पुरवठादार, कॉर्पोरेट, प्रोफेशनल्स, स्टार्टअप्स इत्यादी उद्यमींना ऍप्सनी भुरळ घातली आहे. खिशाला परवडणारे स्मार्टफोन, मोबाईल सेवा पुरवठादारांची फोर-जी इंटरनेट सेवेची खैरात ऍप्स इंडस्ट्रीच्या भरभराटीस कारणीभूत ठरली आहे.

स्मार्टफोनधारकांची प्रचंड संख्या पाहता मोबाईल ऍप उद्योगांसाठीचा अविभाज्य घटक बनला आहे. देशातील तब्बल 90 टक्के ऍप ऍण्ड्रॉईड बेस्ड आहेत. ऍपलसारख्या प्रीमियम श्रेणीतील स्मार्टफोनमधल्या "आयओएस' मंचावरील ऍप्सचे प्रमाण दोन टक्के आहे. इंग्रजी आणि हिंदीव्यतिरिक्‍त 22 भाषांमध्ये ऍप्स तयार केली जातात. नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळाले. डिजिटल व्यवहार करणारे भरमसाठ वाढले. त्यामुळे वित्तीय सेवा देणाऱ्या ऍप्सला अच्छे दिने आले. दोन वर्षांत फिनटेक क्षेत्रातील ऍप्समध्ये सर्वाधिक डाऊनलोड्‌स आणि वापर होत असल्याचे दिसून आले आहे.

खाद्यापासून मनोरंजनापर्यंत...
पाककृती, पर्यटन, प्रवास, नोकरी, शिक्षण, कृषी सेवा, कोडी, गेमिंग, लैंगिक शिक्षण, पेमेंट ऍप, शॉपिंगपासून व्यायाम, योग, मुलांच्या शिकवण्या, संगीत, चित्रपट, अध्यात्म असे विविध प्रकारचे हजारो ऍप्स भारतात उपलब्ध आहेत. लाईव्ह टीव्ही दाखवणारे व्हिडीओ स्ट्रीमिंग प्रकारातील ऍप्सला अलीकडे प्रचंड मागणी आहे.

ऍप डेव्हलपर
विशिष्ट सेवेसाठी किंवा माहितीपूर्ण ऍप्स विकसित करणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांची (ऍप डेव्हलपर) संख्यादेखील झपाट्याने वाढली आहे. बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि हैदराबाद ही तीन शहरे ऍप डेव्हलपर्सची केंद्रे आहेत. स्टार्टअप्ससाठी पोषक ऍप निर्माण करण्याकडे ऍप डेव्हलपर्सचा वाढता कल आहे. भारतातील ऍप्स बाजारपेठेवर चिनी कंपन्यांचा वरचष्मा आहे. जाहिरात हा ऍप कंपन्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.

'ऍप्सफ्लायर्स'चा अहवाल (ऍप इंडस्ट्रीच्या नोंदी)
3 पटीने : 2017 ते 18 मध्ये ऍपचे डाऊनलोड वाढले.
170 मिनिटे : दरदिवशी स्मार्टफोनधारक ऍपवर बिझी.
100 कोटी : ऍप्स देशात इन्स्टॉल.
400 कोटी ः ऍप्स उपलब्ध.
40 कोटी : डॉलर्सपर्यंत भारतातील ऍप्सच्या बाजारपेठेची झेप.
85 टक्के : ऍप्समुळे फसवणुकीचे वाढलेले प्रमाण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com