शिर्डी विमानतळाच्या वाढीव धावपट्टीस मंजुरी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई  - शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे शताब्दी वर्ष 2017-18 मध्ये साजरे करण्यात येणार आहे. त्यासाठी जगभरातील भाविक साईबाबांच्या दर्शनाला येतील. त्या पार्श्‍वभूमीवर शिर्डी विमानतळाच्या 700 मीटर वाढीव धावपट्टीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. 

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 57 वी बैठक सह्याद्री अतिथिगृह येथे झाली. त्या वेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष विश्वास पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्‍यामलाल गोयल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक संजय शेट्टी, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

या 700 मीटरची लांबीच्या वाढीस धावपट्टीचे काम लवकर पूर्ण करावे, हे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या आकाराची बोइंग विमाने उतरू शकतील व या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी त्यासाठी हे काम लवकर पूर्ण करावे आणि या विमानतळामुळे भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना तत्काळ नोकरीत घ्यावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या वेळी चंद्रपूर, अमरावती, कोल्हापूर विमानतळांच्या कामांना गती देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.