"आषाढी'तून एसटीला 13 कोटींचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

सोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यंदाच्या आषाढीसाठी राज्यभरातून 3 हजार 300 बस उपलब्ध करून दिल्या होत्या. 11 ते 20 जुलै या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाला 13 कोटी 9 लाख रुपयांचे (अंदाजे) उत्पन्न मिळाले असल्याची माहिती सोलापूरचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली. 

महामंडळाच्या सहा विभागांमधून पंढरपूरला येण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. आषाढीसाठी 3 हजार 300 बसच्या माध्यमातून एकूण 13 हजार 134 फेऱ्या झाल्या आहेत. या फेऱ्यांमध्ये महामंडळाच्या बसने 33 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. महामंडळाच्या बसमधून 5 लाख 64 हजार भाविकांनी प्रवास केला असल्याचे जोशी यांनी सांगितले. 

उत्पन्न वाढले प्रवासी घटले 

गेल्या वर्षी आषाढी यात्रेत महामंडळाच्या बसच्या 14 हजार 564 फेऱ्या करत 35 लाख 99 हजार किलोमीटरचा प्रवास झाला होता. सहा लाख 39 हजार प्रवाशांना या सेवेचा लाभ घेतला होता. त्यातून महामंडळाला 13 कोटी 56 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी 5 लाख 64 हजार प्रवाशांनी लाभ घेतला. त्यातून महामंडळाला सुमारे 13 कोटी नऊ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. अद्याप काही विभागांचा अहवाल बाकी असल्याने उत्पन्नात वाढ होणे शक्‍य आहे.

महाराष्ट्र

मुंबई - कर्जमाफीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेतून अल्पभूधारकाची अर्थात जमीनधारणेची...

09.06 AM

मुंबई - शेतकऱ्यांना कर्जमाफी, महसुली जमेची तूट आणि वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) सावट या आर्थिक चक्रव्यूहात राज्याची...

03.45 AM

भारत सरकार विविध नदी जोड प्रकल्पांवर 5,60,000 कोटी रु. खर्च करणार आहे. हा खर्च पुढीलप्रमाणे : सपाटीवरून वाहणाऱ्या 16...

03.39 AM