विरोधकांचीही जागा हडपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

सोलापूर - निवडणुका आल्या की आमचे पटत नाही असे सांगायचे. केंद्रातील व राज्यातील सत्तेचा संसार मात्र एकत्रित करायचा. सत्ताधारी व विरोधक या राजकारणातील दोन्ही जागा हडपण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप करत आहे. त्यामुळेच राज्याच्या सत्तेत एकत्रित राहणारे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपचे विचार पटत नसतील तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असा सल्ला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिला. 

सोलापूर जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चव्हाण सोलापूरला आले होते. सोलापुरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून शिवसेना-भाजप आपली औकात दाखवत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिलेले एकही आश्‍वासन राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारने पूर्ण केले नाही. दुष्काळ, शेती, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील प्रश्‍न आजही गंभीर आहेत. विकासाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. या प्रश्‍नांवर बोलण्या ऐवजी सत्ताधारी शिवसेना-भाजप एकमेकांवर आरोप करून जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केला. विरोधकांना भीती दाखवून राजकारण करण्याची नीती भाजपची जुनीच असल्याचा टोलाही त्यांनी मारला. 

Web Title: ashok chavan in solapur