अत्रेंच्या साहित्यातून समजते महाराष्ट्राचे मन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

मुंबई - कथा, कादंबरी, विनोद, कीर्तन, नाटके अशा साहित्याच्या प्रत्येक दालनात आचार्य अत्रे यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला आहे. अत्रे म्हणजे मूर्तिमंत एकपात्री साहित्य संमेलन होते. त्यांचे साहित्य, चरित्राचा अभ्यास केल्यास महाराष्ट्राचे मन समजेल, असे गौरवोद्‌गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले. 

मुंबई - कथा, कादंबरी, विनोद, कीर्तन, नाटके अशा साहित्याच्या प्रत्येक दालनात आचार्य अत्रे यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला आहे. अत्रे म्हणजे मूर्तिमंत एकपात्री साहित्य संमेलन होते. त्यांचे साहित्य, चरित्राचा अभ्यास केल्यास महाराष्ट्राचे मन समजेल, असे गौरवोद्‌गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले. 

लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पुरंदरे यांना यंदाचा "आचार्य अत्रे पुरस्कार‘ शनिवारी (ता. 13) विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे आदी दिग्गजांनंतर महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रावर धुके दाटल्याचे जाणवते आहे. आचार्य अत्रे यांची प्रतिभा आता जणू काही रुसली आहे. कथेचे महत्त्व कमी होऊ नये. महाराष्ट्रात भरघोस साहित्यनिर्मिती होऊ दे, असे ते म्हणाले. या वेळी आचार्य अत्रे यांची "चांगुणा‘ कादंबरी आणि त्यांची कन्या शिरीष पै यांच्या "फक्त हायकू‘ कवितासंग्रहाचे प्रकाशन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. नसानसांत शिवचरित्र भरलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांना आचार्य अत्रे पुरस्कार देणे हे माझे भाग्य आहे, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या. त्यांच्या "चांगुणा‘ कादंबरीतील स्त्रीमध्ये दिसणारी हिंमत आणि मानसिक शक्ती आज मला सर्वच महिलांत आढळते. कुटुंबप्रमुख गेल्यावर संपूर्ण कुटुंब सांभाळणाऱ्या स्त्रीमध्येही मला "चांगुणा‘ दिसते, असे कौतुक त्यांनी केले.

महाराष्ट्र

मुंबई - कर्जमाफीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेतून अल्पभूधारकाची अर्थात जमीनधारणेची...

09.06 AM

मुंबई - शेतकऱ्यांना कर्जमाफी, महसुली जमेची तूट आणि वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) सावट या आर्थिक चक्रव्यूहात राज्याची...

03.45 AM

भारत सरकार विविध नदी जोड प्रकल्पांवर 5,60,000 कोटी रु. खर्च करणार आहे. हा खर्च पुढीलप्रमाणे : सपाटीवरून वाहणाऱ्या 16...

03.39 AM