राज्यात 80 हजार कृषिपंपांना वीजजोडणी देणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - राज्यातील 80 हजार कृषिपंपांना वीजजोडणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. महावितरणने दिलेल्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषी पंपांच्या जोडणीचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी कृषिपंपांना वीजजोडणी देण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे जानेवारी 2017 पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील 89 हजार 506 कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा आगामी वर्षभरात 80 हजार 729 कृषी पंपांची जोडणी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासाठी महावितरणला आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून देण्याच्या महावितरणच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने काल (ता.10) मंजुरी दिल्याची माहिती महावितरणने दिली आहे. 

या विशेष योजनेसाठी वर्ष 2017-18 साठी कृषिपंप प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी 916 कोटी वीस लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. राज्यात मार्च 2017 अखेर दोन लाख पाच हजार 590 अर्जदारांनी कृषिपंप वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत. यातील 80 हजार कृषिपंपांना वीज जोडणी मिळणार आहे आहे. मात्र, सव्वालाख शेतकरी कृषिपंपाच्या प्रतीक्षेत राहणार आहेत.

टॅग्स