पर्यटनाला जाताना "लेट' गाड्या टाळा! 

Avoid late trains when traveling to tourism
Avoid late trains when traveling to tourism

नाशिक : पावसाळ्यात काहीजण प्रवास टाळतात; तर काही जणांसाठी ती पर्वणीच असते. आता पाऊस सुरू झाल्याने बाहेरगावी जाण्याचे नियोजन सुरू झाले आहे. आपण पावसाळी पर्यटनाचे नियोजन करत असाल, तर रेल्वेच्या विलंब निर्देशांकावर लक्ष ठेवा. गेल्या महिन्यातील दूरपल्ल्याच्या पाच गाड्यांचा रेल्वे विलंब निर्देशांक वाढला आहे. देशातील रेल्वेचा विलंब निर्देशांक साधारण 80 मिनिटांचा आहे. 

व्हाया नाशिक रोडहून जाणाऱ्या पुरी, रांची, प्रतापगड, उद्योगनगरी, पाटणा व बरेली या पाच गाड्यांच्या विलंबाच्या वेळा सरासरी 2 तासांपर्यंतच्या राहिल्या आहेत. त्यामुळे दूरपल्याच्या प्रवासादरम्यान या पाच गाड्यांचे नियोजन करायचे का, हे आपणच ठरवावे. एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यातील दूरपल्ल्याच्या गाड्यांच्या विलंब निर्देशांकानुसार बरेली, रांची (वास्को द गामा), पटना, पुरी, प्रतापगढ-उद्योगनगरी या गाड्यांचा निर्देशांक उशिराचा राहिला आहे.

मुंबईहून सुटणाऱ्या या रेल्वे गाड्या नाशिक रोड स्थानकाहून पुढे जाणाऱ्या आहेत. सगळ्या गाड्या दूरल्ल्यिाच्या असल्‌,त्य्यिांच्या विलंबाची सरासरी 97 ते 187 टक्‍क्‍यांपर्यंत उशिराची राहिली आहे. गेल्या दोन महिन्यांतील उत्तर प्रदेशातील लोहमार्ग रुंदीकरण, मुंबईतील मेगाब्लॉकसह इतर तांत्रिक कारणे त्याला निमित्त ठरली आहेत. 

विलंब निर्देशांक म्हणजे काय? 

रेल्वेच्या देशभरातील गाड्यांबाबत प्रत्येकवेळी सर्व्हेक्षण करून विलंबाचा निर्देशांक काढला जात असतो. त्यातून विलंबाच्या व नियमित गाड्यांबाबत आलेल्या अहवालानुसार नियोजन करणे रेल्वेला सोपे जाते. गेल्या दोन महिन्यांत हा निर्देशांक साधारण 80 मिनिटांचा होता. एका प्रवासासाठी प्रवाशाला नियोजित आगमन वेळेपर्यंत पोचण्याची प्रतीक्षा करण्यासाठी किती वेळ लागतो, यावर आधारित राष्ट्रीय स्तरावर ही गणना केली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com