बाळासाहेबांच्या नावाने पुरस्कार देण्याचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांना पुरस्कार देण्याची सूचना मुंबई महापालिकेच्या महासभेत मांडण्यात आली आहे.

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांना पुरस्कार देण्याची सूचना मुंबई महापालिकेच्या महासभेत मांडण्यात आली आहे.

प्रशासन व्यवस्थापन आणि विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना राज्य सरकारमार्फत यशवंत पंचायतराज अभियानातर्फे पुरस्कार देण्यात येतो. त्याच धर्तीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांना, सहायक आयुक्तांना, तसेच इतर अधिकाऱ्यांना गौरवण्यात यावे. यासाठी "माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार' असा पुरस्कार सुरू करण्याची ठरावाची सूचना शिवसेनेचे सदानंद परब यांनी महासभेत मांडली आहे. ही सूचना या महिन्यात महासभेत मंजुरीसाठी येणार आहे. महासभेने मंजुरी दिल्यास ती प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येईल.

वैद्यकीय विद्यापीठ सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव आहे. त्याला बाळासाहेबांचे नाव देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.

Web Title: balasaheb thackeray name award praposal