औरंगाबादमध्ये लागले बॅनर; हे माऊली... मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे

Banners were raised in Aurangabad asking Devendra Fadnavis to become the Chief Minister
Banners were raised in Aurangabad asking Devendra Fadnavis to become the Chief MinisterBanners were raised in Aurangabad asking Devendra Fadnavis to become the Chief Minister

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. या सगळ्या गोंधळात भाजप आपला लाभ पाहत असल्याचे दिसत आहे. भाजपकडून अधिकृतपणे या सर्व गोंधळावर कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांच्या वतीने औरंगाबादमध्ये काही बॅनर लावण्यात आले आहेत. यात तेच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. (Banners were raised in Aurangabad asking Devendra Fadnavis to become the Chief Minister)

विधान परिषदेची निवडणूक पार पडताच महाविकास आघाडी सरकारला (maharashtra politics) ग्रहण लागले. निवडणुकीत आपले आमदार फुटू नये म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. तरीही महाविकास आघाडीचे आमदार फुटले. या आमदारांचा शोध घेणे सुरू असताना शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) ३० ते ३५ आमदार नॉट रिचेबल झाले. यामुळे ‘माविआ’चे टेंशन वाढले.

Banners were raised in Aurangabad asking Devendra Fadnavis to become the Chief Minister
मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; ...तर मुख्यमंत्री का झाले

तीन ते चार दिवसांपासून शिवसेनेचे टेंशन वाढले असताना महाविकास आघाडी सरकार अडचणीत आली आहे. सरकार पडते की काय अशीच स्थिती आहे. मात्र, शिवसेना सोडून काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने भाजपवर संशय व्यक्त केलेला नाही. तसेच भाजपही या सर्व गोंधळावर उघडपणे काहीही बोलत नाही आहे.

सर्व गोंधळ सुरू असतानाच भाजपने एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला ऑफर दिल्याची बातमी आली. केंद्रात आणि राज्यात काही मंत्रिपद आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चाच आहे. यावरही कोणीही कोणतेही भाष्य केलेले नाही, हे विशेष...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com