बेडकिहाळला दहा एकरातील ऊस खाक 

बेडकिहाळ ः येथे उसाच्या फडाला लागलेली आग. 
बेडकिहाळ ः येथे उसाच्या फडाला लागलेली आग. 

बेडकिहाळ, जि. बेळगाव - येथील पालखी रस्ता नारे मळा भागातील 10 एकरातील उसाच्या फडास गुरुवारी (ता. 14) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. यामध्ये अशोक नारे व बेबीताई नारे यांचा प्रत्येकी अडीच एकर, कुमार नारे यांचा दोन एकर, कलगौडा व कुबेर नारे यांचा तीन एकरात ऊस जळून खाक झाला. एकुण 600 ते 700 टन ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सुमारे 20 ते 21 लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

दुपारी पालखी रस्ता नारे मळा भागातील सर्व्हे नं. 523-ए व बी या शेती क्षेत्रातील दहा एकरातील उसाच्या फडाला आग लागली. यामध्ये सुमारे 600 ते 700 टन उसाचे नुकसान झाले. अशोक नारे यांच्या उसाच्या शेतात तीन लाखाच्या ठिबक सिंचनच्या पाईप होत्या. त्या आगीमुळे जळून खाक झाल्या आहेत. 

आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. सदलगा येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. ग्रामतलाठी एस. एन. नेमण्णावर, सहाय्यक कुमार शास्त्री यांनी जळीत उसाची पाहणी केली. यंदा परिसरात ऊस जळण्याच्या घटना वाढल्या आहेत.

अतिवृष्टी व ढगाळ वातावरणामुळे ऊस उत्पादक शेतकरीही मेटाकुटीस आले आहेत. यातच उसाच्या शेतात ओल असल्याने अद्याप ऊस भरलेल्या गाड्याही बाहेर काढण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. त्यात भर म्हणून आगीच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com