आप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात एक ठार दोन जखमी 

अनिल पाटील
मंगळवार, 16 जानेवारी 2018

कोगनोळी - पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आप्पाचीवाडी फाट्याजवळ काल (सोमवारी) रात्री अकराच्या सुमारास ट्रक व मोटार यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये एक ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत. 

कोगनोळी - पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आप्पाचीवाडी फाट्याजवळ काल (सोमवारी) रात्री अकराच्या सुमारास ट्रक व मोटार यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये एक ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत. 

याबाबत घटना स्थळावरून व पोलीसकडून मिळालेली महिती अशी, मोटार क्रमांक एपी 10 एएक्‍स 4239 हैद्राबाद येथून गोवा व तेथून कोल्हापूर येथील महालक्ष्मी दर्शनासाठी जात होती. आप्पाचीवाडी उड्डाणपुलाजवळ कोल्हापूरहून बेळगावकडे जात असलेला ट्रक क्रमांक एम एच 11 एम 6931 चालकाचा ताबा सुटल्याने डिव्हाडरवर आदळला. तसाच तो पुढे मोटारीस जाऊन धडकला. अपघातानंतर दोन्ही वहाने सेवा रस्त्याच्या गटारीत जावून पडली. या अपघातामध्ये चालक संतोष सदाशिव कोगलीबाईमठ (वय -49 ) हे जागीच ठार झाले. तर मोटारीमधील त्यांची पत्नी उषा संतोष कोगीलबाईमठ (वय 40) व मुलगी श्रेया संतोष कोगीलबाईमठ (वय 14 ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी निपाणी येथील महात्मा गांधी रूग्णालयात व तेथून पुढे कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. 

Web Title: Belgaum News accident near Appachiwadi