चिक्कोडी कारखान्याच्या अध्यक्षपदी अमित कोरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

चिक्कोडी - सहकारी तत्त्वावरील राज्यात अग्रेसर असलेल्या चिक्कोडी येथील दूधगंगा-कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महामंडळाचे उपाध्यक्ष अमित कोरे तर उपाध्यक्षपदी शिरगुप्पी येथील सुभाष कात्राळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

साखर कारखान्याची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडणूक पार पडल्याचे निवडणूक अधिकारी आर. एस. नुली यांनी जाहीर केले. त्यानंतर कारखान्याच्या सभागृहात नूतन संचालक मंडळाची राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात संचालक मंडळाने या दोघांची बिनविरोध निवड केली. 

विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, ज्येष्ठ संचालक एस. एन. सप्तसागरे, के. के. म्हैशाळे, प्रकाश पाटील, कारखान्याचे संचालक अजित देसाई, अण्णासाहेब जोल्ले, बाळगौडा रेंदाळे, भरतेश बनवने, चेतन पाटील, महावीर मिरजे, मल्लाप्पा म्हैशाळे, मल्लिकार्जुन कोरे, परसगौडा पाटील, रामचंद्र निशानदार, संदीप पाटील, तात्यासाहेब काटे, नंदकुमार नाशिपुडी, कार्यकारी संचालक रवींद्र पट्टणशेट्टी, कार्यालय अधिक्षक आनंद कोटबागी उपस्थित होते. 

Web Title: Belgaum News Amit Kore selected as Chairman of Sugar Factory