सुवर्णसौधवर ‘लाख मराठा’

सुवर्णसौधवर ‘लाख मराठा’

बेळगाव -  मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी कर्नाटकच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मराठा बांधवांनी मंगळवारी (ता. २१) सुवर्णसौधवर मोर्चा काढला. मराठा समाजाचा ३ बी मधून २ ए मध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्या त्यांनी सरकारसमोर मांडल्या. 

भगवे ध्वज आणि भगवे फेटे बांधून हजारो मराठे सहभागी झाल्यामुळे परिसर भगवा झाला होता. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आदी घोषणा देऊन आंदोलकांनी अवघा परिसर दणाणून सोडला. कर्नाटकात मराठा समाजाची संख्या ६० लाखांवर आहे. मात्र मराठा समाजाला सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावे. 
त्याचबरोबर इतर मागण्या मान्य कराव्यात, यासाठी कर्नाटकाच्या अनेक भागांमध्ये मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले. त्यात लाखोंचा सहभाग होता. त्यानंतरही अनेकदा राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी सरकारकडे समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने केवळ आश्‍वासनच दिल्यामुळे पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाने सुवर्णसौध परिसरात आंदोलन केले. बेळगाव जिल्ह्यासह कारवार, धारवाड, विजापूर, बिदर, बागलकोट, हावेरी, गदगमधील मराठा समाज बांधवांनी आंदोलनात भाग घेतला. 

समाज कल्याण मंत्री एच. आंजनेय, मंत्री संतोष लाड, विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर, औरादचे आमदार प्रभू चव्हाण, विधान परिषद सदस्य एस. एल. घोटणेकर, श्रीनिवास माने, धजदचे एम. एस. कोनरेड्डी यानी आंदोलकांची भेट घेऊन मराठा समाज्याच्या मागण्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले. मंत्री एच. आंजनेय यांनी आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.

अल्पोपाहाराची सोय
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या मराठा बांधवांसाठी बेळगाव मराठा समाजातर्फे अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटपही करण्यात आले. आंदोलनस्थळी मराठा समाजातील पदाधिकारी समाजासमोरील समस्या मांडत होते. याला उपस्थित टाळ्यांच्या गजरात साथ देत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com