निपाणी पालिका सभापतीपदी नितीन साळुंखे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

निपाणी - नगरपालिकेच्या सभापतीपदी नगरसेवक नितीन साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी (ता. 12) सायंकाळी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही निवड झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर होते.

निपाणी - नगरपालिकेच्या सभापतीपदी नगरसेवक नितीन साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी (ता. 12) सायंकाळी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही निवड झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर होते. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नाभिक समाजाला मान मिळाल्याने समाजबांधवासह कार्यकर्त्यांनी फटाक्‍याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. 

प्रारंभी पालिका आयुक्त दीपक हरदी यांनी स्वागत केले. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी नगरसेवक नितीन साळुंखे यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाली.

नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले,"गेल्या साडेचार वर्षात पालिका सभागृहात सर्व जाती, धर्मांना एकत्रित घेऊन त्यांना पदे दिली आहेत. ज्येष्ठ नेते मंडळींच्या सूचनेनुसार निपाणी शहराचा विकास साधला जात आहे. आता सामान्य कार्यकर्त्याला सभापतीपदाची संधी दिली आहे. त्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे कार्य केले आहे. यापुढील काळात सर्वांना विश्‍वासात घेऊन शहराला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे. सभापतीपदाचा काळ कमी असला तरी त्यामध्ये कोणताही श्रेयवाद अथवा भेदभाव न करता शहराचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे." 

पिग्मी कलेक्‍टर ते सभापती 

नितीन साळुंखे हे नगरसेवक होण्यापूर्वी बऱ्याच वर्षापासून येथील धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेमध्ये पिग्मी कलेक्‍टर म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर त्यांनी नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्द सुरु केली. आता सभापतीपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. या निवडीमुळे नाभिक समाजात वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.

नूतन सभापती नितीन साळुंखे म्हणाले,"पालकमंत्री रमेश जारकिहोळी, खासदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, प्रा. सुभाष जोशी, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर व सर्व नगरसेवकांनी आपल्यावर विश्‍वास ठेवून सभापतीपदाची जबाबदारी दिली आहे. त्या विश्‍वासाला पात्र राहून निपाणीच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहे."

यावेळी पालिकेसह विविध संघ, संस्था व नाभिक समाजातर्फे नितीन साळुंखे यांचा सत्कार झाला. स्थायी समिती सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. 

उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार, संजय सांगावकर, राजेंद्र चव्हाण, रवींद्र शिंदे, धनाजी निर्मळे, अनिस मुल्ला, दिलीप पठाडे, रवींद्र चंद्रकुडे, निता लाटकर, लता शेटके, मिनाक्षी बुरुड, जायेदा बडेघर, नजहतपरवीन मुजावर, विजय शेटके, उदय शिंदे, शिरीष कमते, सचिन पोवार, जीवन गिझवणेकर उपस्थित होते. 

Web Title: Belgaum News Nitin Salunkhe as Nipani Palika speaker