कितीही फलक काढा येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच - संजय आवटे

मिलिंद देसाई
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

बेळगाव - महाराष्ट्र राज्य असे लिहिलेले कितीही फलक काढले तरी येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच आहे, असे प्रतिपादन साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी केले. 

बेळगाव - महाराष्ट्र राज्य असे लिहिलेले कितीही फलक काढले तरी येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच आहे, असे प्रतिपादन साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी केले. 

येळ्ळूर येथील ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते, समाज बदलण्यासाठी धारणा बदलली पाहिजे, माणूस होणं हे साहित्याचे उद्दिष्ठ असले पाहिजे. साहित्यिकांनी वेगळा विचार मांडला पाहिजे. सध्या वेगळा विचार मांडायाचाच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असून जगात होणाऱ्या बदलांबद्दल लिहिले पाहिजे. नव्या पिढीशी संवाद साधला पाहिजे. प्रत्येकाला स्वतःची ओळख ओळखता आली पाहिजे, असेही श्री. आवटे म्हणाले. 

साहित्य आणि कलेने सोबत असले पाहिजे. भारत महासत्ता होणार, ही संकल्पना संपलेली असून हा बदलणारा कालखंड आहे. पुणे, मुंबई येथील परिसंवादाना गर्दी कमी असते, मात्र येळ्ळूर येथील संमेलनामधील गर्दी पाहून चांगले वाटले

- संजय आवटे

श्री आवटे म्हणाले छत्रपती शिवराय व महात्मा फुले यांचा वारसा चालवीत मराठीचा जागर सुरु आहे. शिवाजी महाराज आपले प्रेरणास्रोत आहेत. हे महात्मा फुले यांनी महाराष्ट्राला सांगितले. आज महापुरुषांना आपल्या सोयीनुसार चौकटीत अडकवले जात आहे, 

समकालीन समस्यांबाबत साहित्यीकानी भूमिका मांडने गरजेचे असून कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. आपण जास्तीतजास्त भाषा शिकल्या पाहिजेत. बोली भाषा टिकल्या, तरच संस्कृती टिकेल. वाचनामुळे आपल्या कक्षा रुंदावतात, त्यामुळे आपण साहित्य वाचले पाहिजे. सर्व सामान्य माणूस आज लिहीत आहे. वर्तमानाला जाब विचारणार साहित्य निर्माण झालं पाहिजे. तसेच नव्या जगाचा विचार करून विचार मांडण्याची गरज आहे,  असेही श्री. आवटे म्हणाले

Web Title: Belgaum News Sanjay Awate comment