राज ठाकरे औरंगाबादला पोहोचण्याआधीच संदिप देशपांडेंनी शेअर केला व्हिडिओ

प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच भोंग्याची गरज असते?
Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Summary

प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच भोंग्याची गरज असते?

औरंगाबादच्या सभेला जाण्यापूर्वी राज ठाकरे आज सायंकाळी चार वाजता पुण्यात येणार आहे. यानंतर ३० एप्रिलला सकाळी ते औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. मागील काही दिवसांपासून भोंगा प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे. मिशिदीवरील भोंगे काढून टाका यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेआधी मनसेचे कार्यकर्ते मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. पुण्यातून हजारो कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत औरंगाबादला जाणार आहेत. आता मनेसेकडून आणखी एक बातमी समोर येत आहे. राज ठाकरे औरंगाबादला पोहोचण्याआधीच संदिप देशपांडेंनी भोंगा चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

कोणता आहे हा व्हिडिओ

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' (Bhonga) या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने प्रसिद्धी मिळविली असल्याने चर्चा सुरु आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी लोकांच्या मनात कुतुहल निर्माण झाले आहे. धर्मापेक्षा मोठं कोणी नाही, मग कोणाच्या जीवाला धोका असला तरी चालेल, अशा वृत्तीला दडपून टाकण्यासाठी सुरु असलेले गावकऱ्यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. 'भोंगा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे' हा आशयघन विषय या 'भोंगा' चित्रपटातून 3 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Raj Thackeray
शंभर गाड्या, हजारो कार्यकर्ते, राज ठाकरे पुण्यातून होणार औरंगाबादकडे रवाना

काय आहे चित्रपटाचा नेमका आशयघन

'भोंगा' चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. एका कुटुंबातील चिमुकल्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखीन परिणाम होत जातो. बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहतच असतो, हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते, या भोवती चित्रपटाचे कथानक फिरते.

दरम्यान, हा चित्रपट अमेय खोपकर, संदीप देशपांडे, आणि अमोल कागणे फिल्मस् प्रस्तुत असून, चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे. चित्रपटात अभिनेत्री दिप्ती धोत्रे, अभिनेता कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, सुधाकर बिराजदार, अरुण गीते, महेंद्र तिसगे, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.

Raj Thackeray
केंद्र-राज्य संघर्षाचा भडका उडणार? शिवसेनेने व्यक्त केली भीती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com